अभिनेत्री कोएना मित्रासह चौघांची तक्रार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर कृत्रिमरीत्या चाहत्यांचा (फॉलोअर्स) आकडा फुगवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यापैकी चित्रपट-मालिकांशी संबंधित चार ख्यातनाम व्यक्तींनी आपल्या बनावट समाजमाध्यम खात्यांबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार केली. तक्रार करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री कोएना मित्रा हिचा समावेश आहे.

गेल्या काही महिन्यांपासून आपल्या नावे बनावट इन्स्टाग्राम खाते अस्तित्वात असल्याची माहिती मित्र, चाहत्यांकडून मिळाली, असे कोएनाने तक्रारीत म्हटले आहे. कोएनाचे छायाचित्र, नाव वापरून तयार केलेल्या या खात्यावर ३६ हजार चाहते आहेत. चाहत्यांना कोएनाबाबत चौकशी करायची असेल तर साहिल खान एहसास या व्यक्तीशी संपर्क साधा, असा त्यावर उल्लेख आहे. इन्स्टाग्रामसोबत कोएनाच्या नावे युटय़ूब चॅनेलही होते, असा दावा या तक्रारीत आहे. हे प्रकरण गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे सोपावण्यात आले आहे. या विभागाने फेसबूक, गुगलशी पत्रव्यवहार करून कोएनाच्या नावे अस्तित्वात असलेले बनावट इन्स्टाग्राम खाते, युटय़ूब चॅनल बंद करून घेतले.

‘फॉलोअर्सवरकार्ट’ या संकेतस्थळाकरवी चाहते वाढविणाऱ्या १७६ पैकी १२ ख्यातनाम व्यक्तींची पथकाने चौकशी केली. तसेच दोन संकेतस्थळांच्या संचालकांना चौकशीसाठी बोलावले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress koena mitra complaint about fake social media accounts zws
First published on: 22-07-2020 at 04:05 IST