शिवसेना या पक्षावर दावा सांगण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटामध्ये न्यायालयीन लढाई सुरु आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे विविध याचिका दाखल करण्यात आल्या असून याची एकत्रित सुनावणी सर्वोच्च न्यायालयामधील पाच सदस्यीय घटनापिठासमोर सुरु आहे. अशातच राज्यामधील वेगवेगळ्या बैठकी, सभा आणि कार्यक्रमांमध्ये दोन्ही गटांकडून पक्षावर दावा सांगितला जात आहे. मुख्यमंत्री शिंदेंही अनेकदा ‘शिवसेना ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही’ असं म्हणाले आहेत. याच टीकेला आता युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उत्तर दिलं आहे.
नक्की वाचा >> दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागलेली शिंदेंच्या बंडाची चाहूल? आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आमच्या घरात…”
आदित्य ठाकरेंनी शिवसेनेवर हक्क सांगणाऱ्या शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे. शिवसेना ही खासगी मालकीची संस्था नाही असं विधान करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंनी एक आव्हान दिलं आहे. “शिवसेना काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. बाळासाहेबांचे विचार म्हणजे ठाकरे कुटुंबाची जहागीर नाही असं शिंदे म्हणतात. सोन्याचा चमचा घेऊन जो माणूस जन्माला आला नाही तो सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो, पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो असंही ते म्हणाले होते. मुळात प्रचार असा सुरु आहे की शिवसेना शिवसैनिकांची आहे. बाळासाहेबही असं म्हणायचे. शिवसैनिकांचा शिवसेनेवर दावा आहे. फक्त ठाकरे परिवार त्यावर आपला दावा सांगू शकत नाही. बाकी लोकही दावा सांगू शकतात, असा प्रचार शिंदेंकडून केला जातोय. त्याला तुम्ही कसं उत्तर देणार. हे म्हणत आहेत की खरे शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. ज्या शिवसैनिकांना काँग्रेसबरोबर युती करायची नव्हती ते आमच्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. असं म्हणत ‘मुंबई तक’च्या मुलाखतीमध्ये शिंदेंच्या दाव्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
नक्की वाचा >> शिंदे, फडणवीस आणि नार्वेकर एकाच मंचावर; बैठकीला उपस्थित असणारे सरनाईक म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी…”
शिवसेना प्रायव्हेट पॉपर्टी असल्याच्या दाव्यावरील प्रश्नावर आदित्य यांनी पहिली प्रतिक्रिया देताना, “हे हस्यास्पद आहे. अडीच वर्ष जे काही करायचं त्यांनी करुन घेतलं. जेव्हा क्षमता आली स्वत:मध्ये की आपण दुसऱ्यांना खोक्याने विकत घेऊ शकतो. तेव्हा त्यांनी जी गद्दारी करायची होती ती केली,” असं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> “शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदेंकडे गेलं तरी…”; आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, “हा प्रश्न शिवसेना, धनुष्यबाण, ठाकरे…”
तसेच, “हे हस्यास्पद असल्याचं म्हणण्यामागे दोन प्रमुख गोष्टी आहेत. एक जर तसं असलं तर ठाकरे हे नाव, शिवसेना या नावाची त्यांना काय गरज आहे? शिवसेना कोणाची प्रायव्हेट पॉपर्टी नसेल तर तुम्ही ४० गद्दारांनी तसेच मी एकट्याने आमदारकीचा राजीनामा देऊ आणि लोकांसमोर जाऊ. होऊन जाऊ दे फैसला एकदाचा जनतेमध्ये. जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल,” असंही आदित्य म्हणाले.
“कुठेही नैतिकता दाखवायची नाही. लोकशाहीचा, संविधानाचा आदर करायचा नाही. जी काही विचारसरणी आहे त्याचा आदर न करता खोटं बोलत राहायचं. निवडणुकीला सामोरे जाण्याचं हिंमत दाखवायची नाही हे बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांना शोभत नाही,” असा टोला आदित्य यांनी शिंदेंना लगावला. “कुणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नसेल तर हे तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही, लोक ठरवतील. ४० गद्दारांनी आणि मी राजीनामा देऊ आणि उद्या निवडणुकीला सामोरे जाऊ. होऊन जाऊ दे एकदाचं. माझं चॅलेंज आहे,” असं आदित्य यांनी म्हटलं आहे.