scorecardresearch

Premium

“अशोक चव्हाण भाजपात जाणार”, संजय शिरसाटांच्या दाव्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात जातील, असा मोठा दावा केला.

Ajit Pawar Ashok Chavan Sanjay Shirsat
अजित पवार, अशोक चव्हाण व संजय शिरसाट (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात जातील, असा मोठा दावा केला. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिली प्रत्युत्तर दिली. “अशोक चव्हाण भाजपात जाणार असं संजय शिरसाटांना पिंजऱ्यातील पोपटाने काढलेल्या चिट्ठीत दिसलं का?” असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. ते सोमवारी (३ एप्रिल) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “पिंजऱ्यात ठेवलेला पोपट बाहेर येतो आणि एक एक चिट्ठी चोचीने उचलतो. त्या चिट्ठीत संजय शिरसाटांना अशोक चव्हाण भाजपात जाणार असं दिसलं आहे का? काल सर्वांनी अशोक चव्हाण यांचं भाषण ऐकलं. कुणीही काहीही बोलायला लागलं आहे.”

eknath shinde ajit pawar bjp leaders sattakaran
शिंदे-पवारांच्या कुरघोडीने भाजप नेत्यांची पंचाईत
jayant patil vs samrat mahadik
शिराळ्याचे राजकारण कोणत्या दिशेने?
Anil Deshmukh Samudrapur
…अन् माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच भारावले! नेमकं काय घडलं? वाचा…
B K Hariprasad
कर्नाटक : काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर, बड्या नेत्याची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका!

“अशोक चव्हाणांची भेट झाली, तर मी त्यांना विचारेन”

“अशोक चव्हाण भाजपात जातील असं मला अजिबात वाटत नाही. असं असलं तरी आपण अशोक चव्हाण यांना याबाबत विचारू शकता. माझी आणि अशोक चव्हाण यांची भेट झाली, तर मी त्यांना याबाबत विचारेन,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.

“रिक्षावाला हा शब्द शरद पवारांचा नाही”

अजित पवार अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर म्हणाले, “शरद पवारांनी ५०-५५ वर्षांच्या राजकीय जीवनात काम करताना, सर्वच गोष्टींचा आदर केला आहे. अतिशय कष्ट घेऊन आमचे घराणे पुढे आले आहे. पण, अरविंद सावंतांनी सांगितले, रिक्षावाला हा माझा शब्द होता. शरद पवारांचा नाही.”

हेही वाचा : धीरेंद्र शास्त्रींनी साईबाबांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवारांनी केलं भाष्य; म्हणाले, “या बाबा लोकांचे…”

“खुर्चीबद्दल कोणताही भेदभाव केलेला नाही”

छत्रपती संभाजीनगर येथील सभेला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी वेगळी खुर्ची ठेवण्यात आली होती. यावरून वेगवगळे राजकीय अर्थ काढण्यात येत होते. यावरही अजित पवारांनी भाष्य केले आहे. “उद्धव ठाकरेंना पाठीचा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे आजही ते ताठ बसता येईल, अशी खुर्ची वापरतात. म्हणून सभेच्या ठिकाणीदेखील अशीच खुर्ची ठेवण्यात आली होती. यात खुर्चीबद्दल कोणताही भेदभाव केलेला नाही,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar comment on claim of sanjay shirsat about ashok chavan joining bjp pbs

First published on: 03-04-2023 at 17:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×