मराठवाडय़ातील मागील पिढीतील दलित पँथरचे लढाऊ कार्यकर्ते आणि डेमॉकॅट्रिक रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार टी. एम. कांबळे यांच्या अकाली निधनाने आंबेडकरी चळवळीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, अर्जुन डांगळे, गौतम सोनावणे, तसेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
आठवले यांच्याशी मतभेद झाल्यानंतर कांबळे पक्षातून बाहेर पडले आणि भाई संगारे व चंद्रकांत हंडोरे यांच्या मदतीने त्यांनी स्वतंत्र रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. पुढे भाई संगारे यांचे निधन झाले आणि हंडोरे यांनी काँग्रेसची वाट धरली, परंतु इतर कोणत्याही पक्षात न जाता कांबळे यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिकन या नावाने आपला स्वत:चा गट चालू ठेवला. त्यांनी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढविल्या, परंतु त्यात यश मिळाले नाही. गेली दोन वर्षे ते किडनीच्या विकाराने आजारी होते. लातूरमध्ये शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधानबद्दल आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Sep 2013 रोजी प्रकाशित
आंबेडकरी चळवळीतील नेते टी. एम. कांबळे यांचे निधन
मराठवाडय़ातील मागील पिढीतील दलित पँथरचे लढाऊ कार्यकर्ते आणि डेमॉकॅट्रिक रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार टी. एम. कांबळे

First published on: 29-09-2013 at 05:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambedkarite movement leader tm c t kambale passed away