भटक्या प्राण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या निवारा संस्थेतच प्राण्यांची अक्षम्य हेळसांड झाल्याची घटना ठाणे जिल्ह्य़ात घडली आहे. या संस्थेच्या मालकांच्या निष्काळजीपणामुळे या निवारा संस्थेतील ३० प्राण्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वज्रेश्वरी येथे नोव्हेंबर महिन्यात ‘हार्ट्स’ या सामाजिक संस्थेने भटक्या प्राण्यांसाठी निवारा केंद्र सुरू केले. वैष्णवी भट्ट आणि श्रेया अ‍ॅड्री यांनी या संस्थेची सुरुवात केली होती. याच महिन्यात ‘अवेअर’ फाऊंडेशनच्या जेनी विवीएनी यांनी विश्वस्तांकडून निधी मिळत नसल्यामुळे ग्रँट रोडमधील त्यांच्या निवारा केंद्रातून सुमारे ८० प्राणी वज्रेश्वरीतील ‘हार्ट्स’ या निवारा केंद्रात आणले होते. मात्र प्रवासादरम्यान जेनीने एकाच लहानशा पिंजऱ्यात १० मांजरी ठेवल्यामुळे यातील सहा मांजरींचा गुदमरून जागीच मृत्यू झाला. त्याशिवाय या प्रवासादरम्यान अनेक प्राणी जखमी झाले. प्राण्यांना सांभाळणे शक्य नसल्याने जेनीने या प्राण्यांना वज्रेश्वरीतील निवारा केंद्रात सोडले. मात्र या केंद्रातही प्राण्यांचे अतोनात हाल झाले. या केंद्रात प्राण्यांचा सांभाळ करणारा व्यक्ती मार्चमध्येच निवारा केंद्र सोडून गेला होता. त्यामुळे गेले दोन महिने प्राण्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal neglect in vajreshwari animal shelter
First published on: 05-05-2017 at 02:01 IST