लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी २२ सप्टेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर होती. आता मुंबई विद्यापीठ प्रशासनाने अर्ज करण्यास मुदतवाढ दिली असून सोमवार, १६ ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत विद्यापीठाच्या https://mu.ac.in/carees या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील कुलसचिव (अनुदानित – खुला प्रवर्ग), अधिष्ठाता विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा (अनुदानित – खुला प्रवर्ग), अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा (अनुदानित – खुला प्रवर्ग), अधिष्ठाता मानव्यविद्याशाखा (अनुदानित – खुला प्रवर्ग), अधिष्ठाता आंतर विद्याशाखीय अभ्यास (अनुदानित – खुला प्रवर्ग), वित्त व लेखा अधिकारी (अनुदानित – खुला प्रवर्ग), संचालक आजीवन अध्ययन व विस्तार (अनुदानित – खुला प्रवर्ग) आणि संचालक माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान विभाग (विनाअनुदानित – खुला प्रवर्ग) या पदांसाठी अर्ज दाखल करण्यास विद्यापीठ प्रशासनाने मुदतवाढ दिली आहे.
आणखी वाचा-मुंबईः कुलगुरूंच्या नावामुळे महिलेचे बिंग फुटले; खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे महिला लंडनला जात होती
या सर्व पदांकरिता विहित नमुन्यातील अर्ज, शुल्क, शैक्षणिक अर्हता, अनुभव, नियम व अटी आदी सविस्तर माहिती विद्यापीठाच्या http://www.mu.ac.in या संकेतस्थळावरील ‘Careers’ या लिंकवर उपलब्ध होईल. सदर पदांच्या जाहिरातीच्या मुदतवाढीसंदर्भात संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. सुनील भिरुड यांनी केले आहे.