अनिश पाटील

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळीबारात झालेली हत्या असो वा कल्याण पूर्व येथील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराची घटना. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. गेल्या नऊ वर्षांत मुंबईत १६ गोळीबाराच्या घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. पण, ९० च्या दशकात गोळीबाराच्या घटनांनी उच्चांक गाठला होता. १९९८ मध्ये एकाच वर्षात १०१ जणांचा टोळीयुद्धात बळी गेला होता. मुंबईच्या इतिहासातील तो काळ भयभीत करणारा होता.

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Sanjay Singh
नितीश कुमारांचे बाहेर पडणे ‘इंडिया’ आघाडीसाठी मोठा धक्का? ‘आप’चे संजय सिंह म्हणाले…

मुंबईतील टोळीयुद्धाचा इतिहास फार पूर्वीचा आहे. १९७७ मध्ये उर्दू पत्रकार इक्लाब नातिकच्या मृत्यूनंतर दाऊद आणि करीम लाला टोळीमध्ये युद्ध भडकले होते. त्यातून दाऊदचा भाऊ शबीर कासकर, पठाण टोळीचे अमीर जादा, समद खान याचे बळी गेले होते. प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांना टिपण्याची स्पर्धाच सुरू झाली. नव्वदीच्या दशकात तिने उच्चांक गाठला होता. १९९० ची सुरुवात जगन्नाथ शेट्टीच्या हत्येने झाली. तो गवळी टोळीशी संबंधित असल्याचे बोलले जाते. त्यानंतर दाऊद, अमर नाईक, गवळी यांच्या टोळ्यांमध्ये अधूनमधून खटके उडत होते. त्यानंतर दाऊद टोळीपासून छोटा राजन विभक्त झाला आणि त्यानेही दहशत निर्माण केली.

हेही वाचा >>> फूट टाळण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न; आमदारांची उद्या बैठक, सर्व आमदार पक्षाबरोबरच असल्याचा राज्य प्रभारींचा विश्वास

दाऊद टोळीने १९९० मध्ये मुंबईत आपले वर्चस्व प्रस्तापित केले. या टोळीने १९९१ मध्ये ना. म. जोशी मार्गावरील अमर नाईकच्या ठिकाणावर गोळीबार घडवून आणला होता. त्या वेळी बंदोबस्तासाठी तैनात दोन शिपायांसह ४ जणांचा मृत्यू झाला होता. याच वर्षांत गोल्डन टोळीच्या दोन गुंडाचीही हत्या झाली होती.

खलिस्तानी समर्थक दहशतवाद्यासोबत १९९२ मध्ये झालेल्या चकमकीत उपनिरीक्षक राजू जाधव यांना वीरमरण आले. या कारवाईच्या वेळी दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर ग्रेनेड व एके ४७ मधून बेशूट गोळीबार केला होता. प्रफुल्ल भोसले, राजू जाधव, सुरेश वाव्हळ व इतर सहकाऱ्यांनी दर्शनसिंह आणि प्रीतमसिंह या दोघांना चकमकीत ठार केले. एका महिलेसह तीन दहशतवादी तेथून पळून गेले. याच वर्षी भास्कर सोंजे व फौजदार अशोक एरंडे यांनाही शीख दहशतवाद्यांविरोधातील चकमकीत वीरमरण आले. तर, शिवसेना आमदार विठ्ठल चव्हाण यांची गुरू साटम व त्याच्या साथीदारांनी हत्या केली. याशिवाय शिवसेना नगरसेवक के. टी. थापा यांचीही १९९२ मध्ये छोटा राजनच्या इशाऱ्यावरून हत्या करण्यात आली.

बहीण हसिना पारकरचा पती इब्राहिम पारकर याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमने जे.जे. रुग्णालयात गोळीबार घडवून आणला. इब्राहिम पारकर २६ जुलै १९९२ रोजी नागपाडा येथील जयराम लेनमधील त्याच्या हॉटेलमध्ये बसला होता. त्याच वेळी गवळी टोळीतील शैलेश हळदणकर व बिपीन शेरे या गुंडांनी पारकर वर गोळ्या झाडल्या. त्यावेळी आरडाओरड झाली. पळून जाणाऱ्या हळदणकर व शेरेला स्थानिकांनी मारहाण केली. त्यात जखमी झाल्यामुळे दोघांना जे. जे. रुग्णालयातील कक्ष क्र. १८ मध्ये भरती करण्यात आले होते. त्यानंतर मध्यरात्री दाऊदच्या टोळीतील सुनील सावंत, सुभाषसिंह ठाकूर, श्यामकिशोर गारिकापट्टी यांच्यासह इतर गुंड रुग्णालयात घुसले व त्यांनी बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यात शैलेश जागीच ठार झाला. तर, शेरे गंभीर जखमी झाला. यावेळी सुरक्षेसाठी तैनात पोलीस शिपाई चिंतामण जयस्वाल व केवलसिंह भानावत यांचाही मृत्यू झाला. या हल्ल्यात वैद्याकीय कर्मचाऱ्यासह पाच जण जखमी झाले. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था संपूर्णपणे कोलमडल्याचे चित्र निर्माण झाले होते.

हेही वाचा >>> अजित पवार यांच्याकडून आदित्यनाथ यांच्या मताचे खंडन; समर्थ रामदासांबाबत शरद पवार यांच्या विधानाशी सहमत

शिवसेना आमदार रमेश मोरे व भाजप आमदार प्रेमकुमार शर्मा यांची १९९३ मध्ये हत्या घडवून आणण्यात आली होती. खटाव मिलचे मालक सुनील खटाव यांची १९९४ मध्ये अमर नाईक टोळीकडून ताडदेव परिसरात हत्या केली होती. चित्रपट निर्माते जावेद सिद्दीकी यांचीही अबू सालेमच्या इशाऱ्यानंतर हत्या करण्यात आली होती. प्रदीप जैन या बांधकाम व्यावसायिकाची अबू सालेमच्या इशाऱ्यावरून १९९५ मध्ये हत्या करण्यात आली होती. मुंबईत १९९५ नंतर टोळीयुद्धात वर्षाला किमान ५० जणांचा गोळीबारात मृत्यू झाला. गिरणी कामगार नेते दत्ता सामंत यांची १९९७ मध्ये हत्या झाल्यामुळे मुंबई हादरली होती. पण, १९९८ मध्ये गोळीबाराचे व टोळी युद्धाचे सर्व विक्रम मोडीत काढले. या वर्षात गोळीबारामध्ये १०१ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यात शिवसेना नगरसेवकर केदारी रेडेकर यांच्या हत्येचाही समावेश आहे. पण त्यानंतर मुंबईतील टोळीयुद्धावर नियंत्रण आले.