आर्यन खान प्रकरणात आता हॅकर मनिष भंगाळे याने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे . शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचे कॉल डिटेल व सीडीआर काढण्याच्या कामासाठी मला पाच लाख रुपयांची ऑफर देण्यात आली असा दावा हॅकर मनिष भंगाळे याने केला आहे. तसेच आर्यन खान प्रकरणातील काही संबंधित पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी सांगितले असाही खळबळजनक दावा त्याने केला आहे.

मनिष भंगाळे याने दिलेल्या माहितीनुसार, मला अगोदर १० हजारांची रक्कम देण्यात आली होती. आलोक जैन व शैलेश चौधरी हे दोघे माझ्याकडे आले होते, त्यांनी काही नंबर सांगितले. त्यातील एक नंबर पूजा ददलानी हिच्या नावाने सेव्ह होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला व्हॉट्सअप चॅटमध्ये बदल करण्यास सागितलं. तसंच या दोन व्यक्तींनी मला प्रभाकर साईलच्या नावाने सीमकार्ड काढून मिळेल का असंसुद्धा विचारले,” अशी माहिती माहिती मनिष भंगाळे याने दिली आहे. “जेव्हा मी ऑफर देणाऱ्याचा नंबर TrueCaller वरती चेक केला तेव्हा तो नंबर सॅम डिसूजा या नावाचा असल्याचा दिसत होता,” असंही त्यांनी सांगितलं आहे. मनीष भंगाळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून याबाबत चौकशीची मागणी केली आहे.