अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची पत्नी आशा गवळी (५०) विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. गवळी गँगचे सदस्य ‘मम्मी’च्या नावाने व्यावसायिकाला धमकावून त्यांच्याकडे खंडणी वसुलीसाठी तगादा लावला होता. चौकशीमध्ये ही ‘मम्मी’ दुसरी तिसरी कोणी नसून आशा गवळी असल्याचे समोर आले आहे. अशा गवळी फरार असून तिने खेड सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता.

पण सत्र न्यायालयाने तिला तीन दिवसांच्या आत मंचर पोलीस स्थानकात हजर होण्यास सांगितले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. मोबीन मेहम्मूद मुजावर हा भायखळयाच्या दगडी चाळीत राहतो. दुसरा आरोपी सूरज राजेश यादव हा आंबेगाव आणि बाळा सुदाम पाठारे पुणे चंदन नगरमध्ये राहतो. चंदननगरमधील एका व्यावसायिकाला गवळी गँगकडून खंडणीसाठी धमक्या मिळत असल्याने त्याने मंचर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

पाच लाख रुपये दिले नाहीस तर जीवे ठार मारु अशी धमकी आपल्याला मुजावर आणि यादवने दिली होती असे ४९ वर्षीय तक्रारदाराने म्हटले आहे. तक्रारदार धमक्यांना जुमानत नसल्याने अखेर सुदाम पाठारेने वाघोली येथील दुकानात जाऊन व्यावसायिकाला धमकावले व जबरदस्तीने मम्मी बरोबर बोलायला भाग पाडले. मंचर पोलिसांनी आशा गवळी आणि अन्य तिघांविरोधात खंडणीसह अन्य विविध कलमांखाली आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे.