आम आदमी पक्षाच्या एका महिला कार्यकर्तीवर शुक्रवारी अंधेरीमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. पुष्पा रावत असे या कार्यकर्तीचे नाव असून, तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पुष्पा रावत आपल्या एका मैत्रिणीसह जात असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोर तरुण असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या हल्ल्यानंतर लगेचच पुष्पा रावत हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. पोलीस हल्लेखोराच शोध घेत आहेत.