Baba Siddique Shot Dead at Bandra Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून मुंबईत हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय विश्वात एकच खळबळ उडाली. आज ( १३ ऑक्टोबर ) मरिन लाइन्स येथील बडा कब्रस्तान येथे त्यांचा शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी बाबा सिद्दीकींच्या राहत्या घराबाहेरून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली होती. यावेळी त्यांचे हजारो कार्यकर्ते व नातेवाईक उपस्थित होते.

बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव बडा कब्रस्थानकडे नेलं जात असताना त्यांचे पुत्र झीशान सिद्दीकी प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भर पावसात आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देताना झीशान यांना अश्रू अनावर झाले होते.

हेही वाचा : Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट, चौथ्या आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश!

वडिलांना अखेरचा निरोप देताना झीशान सिद्दीकी भावुक

भर पावसात झीशान यांनी आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. यावेळी उपस्थित कुटुंबीय व जवळच्या मित्रांनी त्यांना धीर दिल्याचं पाहायला मिळालं. ‘फिल्मीज्ञान’ या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी व राजकीय नेते त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी दाखल झाले होते. या सगळ्यांनी झीशान यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत झीशान यांनी राजकारणात प्रवेश केला होता. सध्या वांद्रे पूर्व मतदारसंघ काँग्रेसच्या झीशान सिद्दीकी यांच्या ताब्यात आहे. तर, बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता.

हेही वाचा : Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी हल्लेखोरांनी कितीची सुपारी घेतली होती? पोलिसांनी न्यायालयात दिली माहिती!

हेही वाचा : Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींच्या दोन पैकी एका मारेकऱ्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, तर दुसऱ्याची चाचणी होणार; न्यायालयाचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बाबा सिद्दीकींच्या ( Baba Siddique ) हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर, तिसरा आरोप अद्याप फरार आहे. गुरुमीत सिंग, धर्मराज कश्यप अशी या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यापैकी न्यायालयाने गुरुमीत सिंगला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर धर्मराजने त्याचं वय १७ वर्षे सांगितल्याने त्याची चाचणी करण्यात येणार आहे.