शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती शिवेसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली. दरम्यान, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर दुसऱ्यांदा अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया रविवारी करण्यात आल्यानंतर मंगळवारी ते मातोश्री निवासस्थानी परतले. त्यांचीही प्रकृती उत्तम आहे, असे सूत्रांनी सांगितले. रविवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गानसम्राज्ञी लता मंगेशकर ‘मातोश्री’वर गेल्या होत्या. त्यापूर्वी छगन भुजबळ तसेच अनेक पक्षांच्या नेत्यांनीही बाळासाहेब यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 7th Nov 2012 रोजी प्रकाशित
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती शिवेसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली. दरम्यान, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर दुसऱ्यांदा अॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया रविवारी करण्यात आल्यानंतर मंगळवारी ते मातोश्री निवासस्थानी परतले. त्यांचीही प्रकृती उत्तम आहे, असे सूत्रांनी सांगितले.

First published on: 07-11-2012 at 02:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb condition stable