वानखेडे मैदानावरील पत्रकार कक्षाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी यासंदर्भात घोषणा केली. या प्रस्तावाला त्यांची अनुमती मिळवण्याबाबत मी आणि एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांनी शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी आभार मानत परवानगी दिली, असे डॉ. पी. व्ही. शेट्टी यांनी सांगितले. एमसीएच्या कार्यकारिणी समितीने याआधीच पत्रकार कक्षाला बाळासाहेबांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2013 रोजी प्रकाशित
वानखेडेच्या पत्रकार कक्षाला बाळासाहेबांचे नाव
वानखेडे मैदानावरील पत्रकार कक्षाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी यासंदर्भात घोषणा केली. या प्रस्तावाला त्यांची अनुमती मिळवण्याबाबत मी आणि एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांनी शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
First published on: 29-05-2013 at 03:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackerays name will be given to wankhede media box