लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे अंधेरी येथील बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रेसिअस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेसिअस मार्ग व सहार मार्ग जंक्शन येथे १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी आणि नवीन १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुनी नादुरुस्त १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी काढून टाकण्याचे काम बुधवार, २९ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या १६ तासांदरम्यान अंधेरी व आसपासच्या परिसरात पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असून काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. संबंधित काम पूर्ण झाल्यानंतर वेरावली जलाशय १, २, ३ ची पाण्याची पातळी सुधारेल व त्यामुळे अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ले या भागांच्या पाणीपुरवठ्यामध्ये कायमस्वरुपी सुधारणा होणार आहे.

News About Salman Khan
Salman Khan Threat : सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला ‘या’ राज्यातून करण्यात आली अटक, ५ कोटींची मागितली खंडणी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Mumbais air quality worsened from Diwali fireworks displays on first day itself
दिवाळीनंतरही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाहीच!, सलग पाच दिवसांच्या घसरणीमुळे अशुद्ध हवा
Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
kalyan Dombivli firecracker shop
कल्याण-डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यांवरील फटाक्यांचे मंच हटवा, प्रवाशांसह वाहन चालकांची मागणी
whistle symbol open for bahujan vikas aghadi as well as for other in maharashtra assembly elections
विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी झाले खुले चिन्ह; बहुजन विकास आघाडी सह इतर अपेक्षांना शिट्टी चिन्ह मिळू शकणार
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
belgaon black day marathi news
सीमा भागात काळा दिन; बेळगावात फेरीला प्रतिसाद

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ४ ते ५ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

आणखी वाचा-मिठी नदीच्या रुंदीकरणाआड आलेल्या १४९ बांधकामांवर पालिकेचा हातोडा

या परिसरांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार

१) के पूर्व विभाग – त्रिपाठी नगर, मुन्शी वसाहत, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर वसाहत मातोश्री क्लब, दुर्गा नगर (नियमित पाणीपुरवठा वेळ सकाळी ८ ते १०) सकाळी ८ ते सकाळी ९ वाजेदरम्यान पाणीपुरवठा होईल. दुर्गा नगर, सारीपुत नगर (सकाळी १० ते दुपारी १२) पाणीपुरवठा बंद राहील. दत्त टेकडी, ओबेराय स्प्लेंडर, केलती पाडा, गणेश मंदिर परिसर जोगेश्वरी – विक्रोळी जोडरस्ता (जेव्हीएलआर) (सकाळी ९ ते ११), बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचानगर (सकाळी ११ ते दुपारी २), वांद्रे भूखंड, हरी नगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी (दुपारी १.३० ते दुपारी ३.४०), विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोल डोंगरी, जीवा महाले मार्ग, साई वाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्लेचा बहुतांश भाग (सायंकाळी ५ ते रात्री ८), पंप हाउस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ (सायंकाळी ५ ते रात्री ८), जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलसवाडी (रात्री ८ ते रात्री १०.३०) या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील.

२) पी दक्षिण विभाग – बिंबीसार नगर, बांद्रेकरवाडी, वनराई, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) परिसर (सायंकाळी ७ ते रात्री ९.३०), राम मंदिर मार्ग, गोरेगाव (पश्चिम) (सायंकाळी ७.४५ ते रात्री ९.१५) परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील.

आणखी वाचा-एड्स रोखण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एआरटी केंद्र सुरू करा

३) के पश्चिम विभाग – सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजारपेठ, भर्डावाडी, आंब्रे गार्डन पंप (सकाळी ७.३० ते दुपारी १२), जुहू-कोळीवाडा, जुहू तारा मार्ग (सकाळी ९ ते सकाळी ११) देवराज चाळ, स्वामी विवेकानंद मार्ग (जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता ते जोगेश्वरी बस आगार) (सकाळी ११ ते दुपारी १), स्वामी विवेकानंद मार्ग जोगेश्वरी भाग – २, चार बंगला, डी. एन. नगर, जुहू-वेसावे जोडरस्ता (दुपारी १२.१५ ते दुपारी २.१०), विलेपार्ले (पश्चिम), लल्लूभाई उद्यान, लोहिया नगर, विलेपार्ले गावठाण, मिलन सबवे, संपूर्ण जुहू परिसर, व्ही. एम. मार्ग, नेहरू नगर (दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३०, विलेपार्ले झोन – के पश्चिम ९), मोरागाव, जुहू गावठाण (दुपारी २.३० ते सायंकाळी ४.४० मोरागाव झोन – के पश्चिम ०८), यादव नगर, सहकार मार्ग, बांदिवली हिल, मोमीन नगर, खजूरवाडी, जोगेश्वरी फाटक, जोगेश्वरी स्थानक मार्ग, कॅप्टन सामंत मार्ग (रात्री ९.३० ते रात्री १२, यादव नगर – के पश्चिम ४), गिल्बर्ट हिल, सागर सिटी, गावदेवी डोंगरी, जुहू गल्ली, वायरलेस मार्ग, श्रीनाथ नगर (रात्री १० ते मध्यरात्री १२.३० गिल्बर्ट हिल झोन – के पश्चिम ६) या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील.

पाणी बचतीसाठी सूचना

  • आवश्यक तितकेच पाणी पेल्यामध्ये घेवून प्यावे. शॉवरऐवजी बादलीमध्ये पाणी घेवून आंघोळ करावी. नळ सुरू ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे.
  • घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेवून कामे उरकावीत.- वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यामध्ये पाणी घेवून ओल्या कापडाने वाहने पुसणे सहज शक्य असते. घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका. वॉशिंग मशीनमध्ये एकाच वेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास, मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होवू शकतो.
  • नळ तसेच वॉश बेसिनचे नळ यांचा प्रवाह मर्यादीत करणाऱ्या किंवा तुषार स्वरुपात पाणी प्रवाहित करणाऱ्या तोटी (नोझल) बाजारात सहज उपलब्ध असतात. नळांना अशा प्रकारची तोटी लावून पाण्याची तब्बल दोन तृतीयांश बचत करणे शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी त्याचप्रमाणे सर्व हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी त्याचा वापर करावा.- उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी. जेणेकरून अकारण पाण्याने भरून ठेवलेल्या पेल्यांतील पाणी वाया जाणार नाही.
  • सर्व घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. कोठेही गळती आढल्यास तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी, यातून पाण्याची बचत होते व पाणी दूषित होत नाही. छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओसंडून वाहणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
  • ज्या-ज्या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्या सर्व व्यावसायिक व वाणिज्यिक आस्थापनांनी पाण्याचा अपव्यय टाळून बचत करता येईल, अशा कार्यपद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.