राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कायम आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्योतिबा फुलेंबाबत केलेल्या विधानानंतर ते पुन्हा एका नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. राज्यपालपद हे माझ्यासाठी अयोग्य असून राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख आहे, यात कोणतेही सुख नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शुक्रवारी राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात जैन समाजाला संबोधित करताना ते बोलत होते.

हेही वाचा – राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपतींचा पुन्हा एकेरी उल्लेख, VIDEO शेअर करत मिटकरींचा शिंदे-फडणवीसांना खोचक सवाल

काय म्हणाले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी?

“राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख आहे, यात कोणतेही सुख नाही. हे पद माझ्यासाठी योग्य नाही. कधी कधी मला वाटतं की मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे. परंतू मी ८० वर्षांचा झालो, त्यामुळे मी आता मुमुक्षरत्न नाही बनू शकत. मात्र, जेव्हा सन्यांसी आणि मुमुक्षरत्न राजभवनात येतात, तेव्हा मला आनंद होतो”, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. तसेच “छत्रपती शिवाजी महाराज, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक जन्माला यावे, परंतू आपल्या घरात नाही, तर शेजारच्या घरात, अशी लोकांनी भावना आहे”, असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना त्यांनी पर्यटन मंत्रायलासोबतच तीर्थक्षेत्र मंत्रालय स्थापन व्हावं, अशी इच्छाही व्यक्त केली. “सरकारने ज्याप्रकारे जैन तीर्थ सर्कीट बनवले आहे, इतर तीर्थक्षेत्रांचीही निर्मिती व्हावी. तसेच पर्यटन मंत्रायलाबरोबरच तीर्थक्षेत्र मंत्रालयही स्थापन व्हावं”, असं ते म्हणाले.