मुंबई : महाराष्ट्र दौऱ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि  मुख्यमंत्र्यांच्या वतीने त्यांची भेट घेणारे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात झालेल्या बठकीची अधिकृत माहिती राज्य शासनाने जाहीर करावी. यात  कटकारस्थान असून राज्यातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाण्यास शिवसेना मदत तर करीत आहे का, असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 ममता बॅनर्जी आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीबाबत आमदार शेलार म्हणाले, ममता बॅनर्जी यांचे सरकारी पक्षांनी प्रथेप्रमाणे स्वागत करणे अपेक्षितच आहे. पण त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी घेतलेली भेट व बठक कशासाठी होती? महाराष्ट्रात कोणीही आले की आमचा कौटुंबिक स्न्ोह असल्याचे सांगून या भेटी घेतल्या जातात. तुमचा कौटुंबिक स्न्ोह असेलही, पण महाराष्ट्राचा त्याच्याशी काय सबंध? बांग्लादेशीयांना संरक्षण देणा-या ममता बॅनर्जी यांच्याशी कुठले आले कौटुंबिक संबंध? असा सवालही त्यांनी केला.

महाराष्ट्रातील उद्योगांना आपल्या राज्यात यायचे आमंत्रण देण्यासाठी ममता बॅनर्जी आल्या आहेत. देशभर सर्वत्र उद्योगधंदे असले पाहिजेत, हीच भाजपची भूमिका आहे. मात्र आपल्या राज्यातील उद्योग, रोजगार, व्यवसाय घेऊन जा, असे सत्ताधारी शिवसेना ममता बॅनर्जी यांना सांगत आहे काय? हा प्रश्न आहे. नुकतीच भिवंडीत बांग्लादेशींवर कारवाई झाली. अशा कारवाया पुन्हा करणार नाही, म्हणून शिवसेनेने ममता बॅनर्जीना शब्द  दिला नाही ना? असा सवाल शेलार यांनी केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp ashish shelar slams shivsena over mamata banerjee mumbai visit zws
First published on: 02-12-2021 at 03:11 IST