मुंबई : मुंबईचा सर्वांगीण विकास, आर्थिक प्रगती, सुरक्षा आणि सांस्कृतिक जडणघडणीसाठी योगदान देणाऱ्या ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी रामनाथ गोएंकांसह १८ विभूतींच्या अर्धाकृती पुतळयाचे लोकार्पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ‘हिरोज ऑफ मुंबई’ या कार्यक्रमाअंतर्गत गिरगावातील किलाचंद उद्यानाला हे स्मृती आणि स्फूर्तीस्थळ उभारण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही उभारण्यात आला असून मुंबईच्या उन्नतीसाठी योगदान देणाऱ्या १८ महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची प्रेरणा मुंबईकरांना अविरत मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्याचबरोबर किरचंद उद्यानात पर्यावरणपूरक विकास साधण्याच्या दृष्टीने ‘सूर्यमंडपम’ उभारण्यात आले आहे. उद्यानासाठी आवश्यक वीजपुरवठा सौर उपकरणाच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल. या उद्यानाचे सुशोभीकरणही करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशीष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर यांचे आणि अन्य विभूतींचे वंशजही उपस्थित होते. ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका हे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> निवासी डॉक्टरांचा संप सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानंतरही ‘मार्ड’ संपावर ठाम

यावेळी नड्डा म्हणाले, प्रफुल्लित करणाऱ्या वातावरणासह मनाला प्रज्वलित करेल, अशी ऊर्जा या उद्यानात आहे. आजचे उज्ज्वल भविष्य साकारण्यासाठी या महान विभूतींनी काय योगदान दिले आहे, याची जाणीव या माध्यमातून तरुण पिढीला होईल आणि इतिहासाची ओळख होईल आणि आपल्या देशाबद्दल अभिमानही वृद्धिंगत होईल.

या उपक्रमासाठी लोढा फाउंडेशनतर्फे मंजू लोढा यांनीही सहकार्य केले असून मुंबईच्या प्रगतीमध्ये मूळ नागरिक असलेल्या कोळी बांधवांचे योगदान असल्याने कोळी बांधवाच्या पुतळ्याचीही उभारणी करण्यात आली आहे. या उद्यानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, एक्स्प्रेस समूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, भारतीय चित्रमहर्षी दादासाहेब फाळके, कविवर्य कुसुमाग्रज, ज्येष्ठ वैज्ञानिक होमी भाभा, उद्याोगपती जेआरडी टाटा, मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्याोगपती धीरूभाई अंबानी, ज्येष्ठ उद्याोगपती अशोक कुमार जैन, हुतात्मा बाबू गेनू, सेठ मोती शाह आणि सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत.