ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी दारु तसंच राजकीय नेत्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला असून ताब्यात घेतलं आहे. बंडातात्या कराडकर यांनी सर्व राजकीय नेत्यांची मुलं दारु पितात असं सांगताना आपण पुराव्यासहित सिद्द करु शकतो असाही दावा केला आहे. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाचाही उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा; बंडातात्या कराडकरांचं जाहीर आव्हान

nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल

स्त्रियावंर टिप्पणी करणं आणि खासकरुन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर हे मला फार चुकीचं वाटतं असं सांगताना त्यांनी मानसिकतेमध्ये बदल होण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. कोणतरी काहीतरी बोलतं, त्यावर आंदोलनं होतात पण ही मानसिकतेची गोष्ट आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे-अजित पवार ही ढवळ्या पवळ्याची जोडी – बंडातात्या कराडकर

बंडातात्या कराडकर यांना बोलविता धनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा असल्याची चर्च सुरु असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही पुरोगामी संघटना आहेत. स्त्रियांचा आदर करणं ही संघाची प्राथमिकता आहे. मी संघ आणि भाजपा या दोन्ही संघटनांच्या जवळ आहे. पण मी अराजकीय आहे. देशात स्त्रियांचा सर्वाधिक आदर कुठे होत असेल तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होतो हे मी खात्रीने सांगू शकते”.

“स्त्रियावंर टिप्पणी करणं आणि खासकरुन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर हे मला स्वत:ला फार चुकीचं वाटतं. आपण त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. आपल्या देशात आणि महाराष्ट्रातही कोणीतरी काहीतरी बोलतं, मग त्यावर आंदोलनं होतात. पण ही मानसिकतेची गोष्ट आहे. काय बोलायचं, काय नाही याचा विचार आपण केला पाहिजे. स्त्रियांच्या बाबतीत दरवेळी कधी अत्याचार झाला, कोणी काही बोललं की कारवाई करतो. पण आपल्याला जो अमूलाग्र बदल घडवायचा आहे तो मानसिकतेचा आहे,” असं अमृता फडणवीसांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते बंडातात्या कराडकर ?

साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला होता.

सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंचा उल्लेख करत दारुसंबंधी केलेल्या वक्तव्याप्रकरणी बंडातात्यांचा माफीनामा; म्हणाले, “माझं चुकलं…”

बंडातात्या कराडकर यांनी यावेळी नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचं सांगत काहीजणांची नावंदेखील घेतली. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? असंही ते पत्रकारांना म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या नावाचाही उल्लेख केला. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा असं आव्हानच त्यांनी पत्रकारांना दिलं. तसंच आपण नावं घेतली आहेत त्यांनी पुरावा मागितलं तर सिद्ध करु शकतो असंही म्हणाले. सुप्रिया सुळेंनी बंडातात्या खोटं बोलत आहेत सांगावं असं आव्हानही त्यांनी दिलं.

वाइन विक्रीच्या निर्णयावरुन टीका

“विधानसभेत हा प्रश्न मांडला असता आणि मंजूर झाला असता तर अशा प्रकारचं आंदोलन करता आलं नसतं. पण मंत्रिमंडळातील मूठभर आमदारांनी एकतर्फी निर्णय घेत महाराष्ट्रावर दारुविक्रीचा हा अत्याचार लादला आहे. याविरोधात एकच संस्था तळमळीने काम करत आहे ती म्हणजे व्यसनमुक्त युवक संघ आहे. फक्त समाजाच्या कल्याणासाठी गेली २५ वर्ष आम्ही हे काम करत आहोत. आज शासनाला इशारा देण्यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

बंडातात्या कराडकर पुढे म्हणाले की, “लोकांवर भयंकर असा निर्णय लादण्यात आला आहे त्यावर आम्ही नाराज आहोत. अत्यंत शांततेत आम्ही आंदोलन करत होतो. हातात काठ्या असल्याने पोलिसांचा गैरसमज झाल्याने त्यांना रोखलं होतं. काठ्या बाजूला ठेवून आंदोलन करण्यास आंदोलनाची परवानगी दिल्याने आम्ही पोलिसांचे आभारी आहोत. आम्हाला आधी पुढे जाऊन देणार नसल्याचं कळलं होतं. हे आंदोलन येथे थांबणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर उग्र रुप घेईल. त्यानंतर राज्य सरकारवर वाइन विक्रीची जी धुंदी चढली आहे ती कमी होईल आणि हा निर्णय मागे घ्यावाच लागेल”.

“उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार”

बंडातात्या यांनी भाषणात बोलताना उद्धव ठाकरे सरळमार्गी आहेत, मात्र ढवळ्याशेजारी पोवळा बांधला असा उल्लेख केला होता. यासंबंधी प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते म्हणाले की, “ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही गुण लागला अशी शेतकऱ्याची म्हण आहे”. यावेळी ढवळा कोण? पोवळा कोण? असं विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे पोवळा आणि ढोवळा म्हणजे अजित पवार असं ते म्हणाले.

“अजित पवारांनी दारु विकण्याचा गुण लावला. त्यांनीच मंदिरं खुली करायची नाहीत असं सांगितलं. हे सगळं अजित पवारांचं आहे. मी जाहीर सांगत असतो की ही सगळी मनमानी, दादागिरी..काय अजून लिहायचं असेल ते लिहा,” असंही ते म्हणाले.

बंडातात्यांचा माफीनामा

“ज्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला आहे त्यांच्याशी मी प्रत्यक्ष फोनवर बोललो आहे. माझं चुकलं असेल तर मी क्षमा मागण्यास तयार आहोत. आपल्या तोंडून काही चुकीचं असेल तर क्षमा मागण्यात कमीपणा नाही,” असं बंडातात्या प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

गुन्हा दाखल झाला नाही तर खटला दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आला आहे. तसंच राज्यभरात आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. दरम्यान प्रक्षोभक भाषण आणि बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.