भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकार तसंच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. वरळीतील कोविड सेंटरचं काम किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. कंत्राट मिळाल्यानंतर कंपनी तयार केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला असून यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पेडणेकर यांना खुलं आव्हान दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुंबईतील १० कोविड सेंटरचं फॉरेन्सिक ऑडिट करुन दाखवावं असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. ते म्हणाले की, “मी उद्धव ठाकरेंना आव्हान देतो की, हिंमत असेल तर मुंबईतील सहा कोविंड सेंटरचं फॉरेन्सिक ऑडिट करुन दाखवावं. मी पुढच्या आठवड्यात मुंबईच्या महापौर आणि कोविड सेंटरमधील कमाई उघड करणार आहे. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात महापौरांच्या कंपनीला कोविड सेंटरचं कंत्राट मिळालं आणि हे अपारदर्शक पद्धतीने दिलं आहे”.

Amir Khan Video Supporting Congress Asking for 15 lakhs
“जर कुणाच्या खात्यात १५ लाख नसतील तर..”, म्हणत आमिर खान काँग्रेसच्या प्रचाराला उतरला? Video पाहिलात का?
mla subhash dhote
प्रियंका गांधींच्या सभेला मैदान मिळू नये म्हणून… आमदार सुभाष धोटेंच्या आरोपाने खळबळ
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…

“उद्धव ठाकरेंचा उजवा हात असणाऱ्यालाही अशाच पद्धतीने कोविड सेंटरचं कंत्राट मिळालं आहे. त्याची कागदपत्रं जनतेसमोर ठेवणार आहे,” असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

“ठाकरे सरकारसाठी कोविड हे कमाईचं साधन”

“शिवसेना नेत्यांना आणि ठाकरे सरकारसाठी कोविड हे कमाईचं साधन आहे आणि म्हणूनच रोज सकाळ-संध्याकाळ लॉकडाउनबद्दल बोलत असतात. दहिसरचं केंद्र सुरु झालं, १ जानेवारीपासून ५०० बेड्सची ऑर्डर दिली, पण एकही रुग्ण दाखल नाही. किशोरी पेडणेकरांनी किरीट सोमय्याला गांजेबाज, नशेबाज सांगा पण तुमच्या सत्तेच्या घोटाळ्याचा नाद राज्यातील जनता उतरवणार,” असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

“ठाकरे सरकार गांजाच्या प्रेमात आहे”

किशोरी पेडणेकर यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधताना गांजा पिऊन टीका केली जात असल्याचं म्हटलं आहे. त्यावरुन टोला लगावताना सोमय्या म्हणाले की, “मला वाटतं ठाकरे सरकार गांजाच्या प्रेमात आहे. महापौर सांगतात की, विरोधी पक्षनेत्यांना गांजा चढला आहे. शरद पवार म्हणतात हर्बल गांजा आणि नवाब मलिक सांगतात हलका गांजा….किशोरी पेडणेकरांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मुलगा साईप्रसाद पेडणेकरच्या क्रिश इंटरप्रायजेसला वरळी येथील कोविंड सेंटरचं कंत्राट मिळालं आहे की नाही हे मान्य करावं. हे कंत्राट अपारदर्शक पद्धतीने दिलं का नाही? त्यातून किती कमाई झाली? किशोरी पेडणेकरांनीच त्या कंपनीची स्थापना केली. म्हणूनच शिवेसना नेत्यांसाठी कोविड सेंटर कमाईचं साधन आहे.”