मुंबई : बनावट ‘मजूर’प्रकरणी अटकेसारख्या कठोर कारवाईपासून दिलासा मिळवण्यासाठी भाजप आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापासून रोखण्यासाठी आपल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा दरेकर यांनी अटकेपासून दिलासा मागताना केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अटकेच्या भीतीने दरेकर यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र विशेष न्यायालयाने शुक्रवारी तो फेटाळला होता. त्याचवेळी निर्णयाला आव्हान देता यावे यासाठी त्यांना अटकेपासून मंगळवापर्यंत दिलासा दिला होता. त्यामुळे दरेकर यांनी सोमवारी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली आहे. उच्च न्यायालयाच्या एकलपीठाकडे दरेकर यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

११ ते १५ डिसेंबर २०१७ आणि १८ ते २२ डिसेंबर २०१७ या कालावधीत नागपूर अधिवेशनात असल्याची चुकीची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली असून या कालावधीत मुंबईत मजुरी करत असल्याचा दावा दरेकर यांनी उच्च न्यायालयातील याचिकेत केला आहे.

कोणताही गैरव्यवहार करून पैसा मिळवलेला नाही. याउलट राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापासून रोखण्यासाठी आपल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावाही दरेकर यांनी याचिकेत केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mlc pravin darekar moves to bombay high court zws
First published on: 29-03-2022 at 01:48 IST