मी महाराष्ट्रापासून दूर नाही, मी महाराष्ट्राच्या टीममध्येच आहे असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची घोषणा आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी राज्याचे नेते चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडली आहे. दिल्लीतील नेते निर्णय घेतील, आपण त्यांच्या निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत अशी माहिती दिली. टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आतापर्यंत मला जी जबाबदारी देण्यात आली त्याचं नेहमीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. “मी अलिप्त नाही, तर करोनामुळे शिस्त पाळत आहे. मी कुठेही गेले की गर्दी होऊ नये तसंच लोकांना प्रादूर्भाव होऊ नये यासाठी काळजी घेते. मध्यंतरी गोपीनाथ गडावर जाण्यासाठी परवानगी मागितली होती. पण गर्दी होईल यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून ती परवानगी मिळाली नाही. जिल्हा दौऱ्याची परवानगी मागितली तर त्यांनी प्रादुर्भाव जास्त असल्यने २८ दिवस घरात राहावं लागेल असं सांगितल. घरात राहून लोकांना भेटू शकणार नसू तर काय फायदा. मी प्रशासनाला सहकार्य करत आहे. थेट कार्यक्रमांमध्ये सहभागी न होता व्हर्च्यूअल तसंच व्हिडीओच्या माध्यमातून मी सर्वांच्या संपर्कात आहे,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp pankaja munde on working in the central government sgy
First published on: 27-07-2020 at 22:36 IST