राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मंगळवारी सकाळी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत या ‘संकल्प पत्रा’चे प्रकाशन करण्यात आले. राज्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही या संकल्प पत्रातून देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वीज पुरवठा, शिक्षण, आर्थिक विकास, सर्वसमावेशी विकास, राज्याचा वारसा, सुरक्षित महाराष्ट्र, आरोग्य, महिला, शेती, जनसामान्यांचे कल्याण, विमान वाहतूक, बंदर विकास-जलवाहतूक, सिंचन-पाणीपुरवठा व ग्राम विकास,  रेल्वे विकास, सुराज्य, शेती सुविधा, रस्ते विकास अशा विविध बाबींवर या जाहीरनाम्यातून घोषणांचा वर्षाव करण्यात आल्या आहे.

भाजपाच्या जाहीरनाम्यातील बाबी…

वीज पुरवठा – शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज पुरवठा, १००० मेगावॅटचे पवन ऊर्जा आणि १५०० मेगा वॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प, कचऱ्यापासून वीज निर्मिती.

शिक्षण – पाचवीपासून शेतीवर आधारित अभ्यासक्रम, राज्यात नव्या IIT, IIM, AIIMS या उच्च शिक्षण संस्था उभारणार, औरंगाबादमध्ये क्रीडा विद्यापीठ उभारणार.

आर्थिक विकास – महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ५ आयटीपार्क उभारणार, राज्याच्या प्रत्येक विभागात टेक्नॉलॉजी पार्क, कंत्राटी कामगारांसाठी लवादा बनवणार.

सर्वसमावेशक विकास – धनगर समाजाला १००० कोटींचे विशेष पॅकेज, अनुसुचीत जातीतील प्रत्येक कुटुंबाला घर, अनुसुचित जमातींसाठी एकलव्य निवासी शाळा.

राज्याचा वारसा – छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्नसाठी प्रयत्न.

सुरक्षित महाराष्ट्र – प्रमुख शहरात सीसीटीव्हीचे जाळे पूर्ण करणार, अपराध सिद्धतेबाबत सुधारणा करणार, पोलीस खात्याचे काम अधिक प्रभावी करणार.

आरोग्य – दोन वर्षात महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करणार, १५,००० अद्ययावत आरोग्य केंद्रे उपलब्ध करणार, प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग उपचार व्यवस्था.

महिला – आर्थिक विकासात ५० टक्के भागीदारी, बालसंगोपन सुविधांमध्ये तीन पट वाढ करणार, १ रुपयात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देणार, स्त्री-पुरुष समानता या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करणार.

शेती – गर्भवती शेतमजूर महिलांना सानुग्रह अनुदान देणार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही पीक विमा संरक्षण, मासेमारीसाठी कमी दरात कर्ज व विक्रीसाठी आधुनिक सुविधा.

जनकल्याण – मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाठी प्रयत्न, सरकारच्या विविध योजना प्रभाविपणे राबवणार, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न.

विमान वाहतूक – राज्यातील ८ शहरांमध्ये नवीन विमानतळ सुरु होणार, किफायतशीर दरात नागरी विमान सेवा सुरु होणार, शेतीमाल निर्यातीसाठी विमानसेवा विकसित होणार.

बंदर विकास, जलवाहतूक – कोकणातील बंदरं रेल्वे व महामार्गांनी महाराष्ट्राला जोडणार, मुंबई उपनगरात जलवाहतूक सेवा सुरु होणार, मुंबई-सिंधुदुर्ग जलमार्ग सुरु होणार.

सिंचन, पाणीपुरवठा व ग्रामविकास – प्रत्येकाला घर आणि प्रत्येक घरात नळ, वीज महामंडळाप्रमाणे जल महामंडळ तयार करणार, सर्व ग्रामपंचायती आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करणार.

रेल्वे विकास – मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन होणार, राज्यातील ६ मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सेवा, नाशिकमध्ये हायब्रिड मेट्रो बनणार.

सुराज्य – एक देश, एक निवडणूक यासाठी निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करणार, बोलीभाषा जतन व संवर्धन केंद्र उभारणार, गडकिल्यांच्या संवर्धनासाठी ६२० कोटींची तरतूद.

शेती सुविधा – शेतीकर्ज सवलतीच्या दराने कायमस्वरुपी मिळणार, इथेनॉल उत्पादनाच्या प्रोत्साहनाने साखल उद्योग प्रभावशील, ‘ई-नाम’ द्वारे शेतमालाला जास्तीचा भाव.

रस्ते विकास – प्रत्येक जिल्हा राष्ट्रीय महामार्गाला जोडणार, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेचा कोल्हापूरपर्यंत विस्तार करणार, नागपूर-सावंतवाडी सुपर हायवे होणार.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp release partys manifesto for the upcoming maharashtra assembly elections aau
First published on: 15-10-2019 at 10:57 IST