लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढ्यांमध्ये मिळणारे रक्त व त्याच्या घटकांचे दर निश्चित केले आहेत. या दरानुसारच रक्तपेढ्यांना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रक्तांची विक्री करणे बंधनकारक आहे. मात्र २०१४ ते २०१९ या सहा वर्षांमध्ये रक्तपेढ्यांनी रुग्णांकडून रक्तासाठी निश्चित दराच्या तुलनेत अधिक पैसे आकारून १४७ कोटी रुपयांहून अधिक रकमेची लूट केली आहे.

Anganwadi childrens nutrition costs have not increased in eight years
अंगणवाडी मुलांच्या पोषण आहार खर्चात आठ वर्षात वाढ नाही!
local, accidents, injured,
लोकल अपघातात रोज सरासरी सात प्रवाशांचा मृत्यू, जखमींच्या संख्येत १५ टक्क्यांनी वाढ
New exam paper leak prevention law by Maha government
स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटीला आता कठोर कायद्याचा चाप… ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास, १० लाखांपर्यंत दंड!
42 lakh new demat accounts added in june total crosses rs 16 crore
डिमॅट खाती १६ कोटींपुढे
Hathras Stampede What Exactly happened
Hathras Stampede : “गुरुजींची कार मंडपातून निघाली, अन् लोकांनी…”, पीडिताने सांगितली आपबिती; हाथरसमध्ये नेमकं काय घडलं?
32 thousand crores fundraising through ipo in six months boom in ipo
विश्लेषण : सहा महिन्यांत ३२ हजार कोटींची निधी उभारणी… आयपीओ बाजारातील तेजी कुठवर?
police constable, cheated,
पोलीस शिपाईच फसला सात लाखांना! प्रकरण काय?
gross liabilities of government increased to rs 171 78 lakh crore at the end of march 2024
सरकारचे दायित्व १७१ लाख कोटींवर; मार्चअखेरीस संपलेल्या तिमाहीत ३.४ टक्क्यांची वाढ

रक्त आणि त्यातील घटक उपलब्ध करण्यासाठी रक्तपेढ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून अतिरिक्त शुल्क वसूल करीत असल्याच्या तक्रारी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन राज्य रक्त संक्रमण परिषदेने संबंधित रक्तपेढ्यांनी आकारलेल्या शुल्काच्या पाच पट अधिक दंड करण्याचा निर्णय २०२० मध्ये घेतला होता. मात्र यापूर्वी रक्तपेढ्यांनी केलेल्या लुटीवर दंड ठोकण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषद व अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली होती. त्यानुसार अतिरिक्त शुल्कातील फक्त २० टक्के रक्कम परिषदेकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार परिषदेने दंडाची रक्कम जाहीर केल्यावर रक्तपेढ्यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे परिषदेने यासाठी लेखा परिक्षण करण्यासाठी लेखापरीक कंपनीची नियुक्ती केली. या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील २२ खासगी रक्तपेढ्यांनी अतिरिक्त शुल्कातून १४७ कोटी रुपये जमा केल्याचे उघडकीस आले. माहिती अधिकारी कार्यकर्ते चेतन कोठारी यांना माहिती अधिकारातून राज्य रक्त संक्रमण परिषदेने ही माहिती दिली.

आणखी वाचा-मिठी नदी काठच्या मनोरंजन केंद्र, क्रीडा संकुलाची प्रतीक्षा संपेना

अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाने सर्वाधिक ३ कोटी ४ लाख १८ हजार ९६५ रुपये अतिरिक्त शुल्क जमा केले आहे. त्याखालोखाल माहीम येथील हिंदुजा रुग्णालयाने २ कोटी ३२ लाख ४५ हजार ६४० रुपये, जसलोक रुग्णालयाने २ कोटी २६ लाख ७५ हजार ८५० रुपये अतिरिक्त शुल्क जमा केले आहे. अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या मुंबईतील २२ रक्तपेढ्यांवर परिषदेने २० टक्के दंड ठोठावला आहे. त्यानुसार २७ कोटी ६३ लाख रुपये इतकी रक्कम दंड स्वरुपात आकारण्यात आली आहे. ही दंडाची रक्कम या रक्तपेढ्यांकडून वसूल केली आहे.

दंडातून रुग्णांना शुल्क परत करण्याची व्यवस्था नाही

राज्य रक्त संक्रमण परिषदेने २०२० मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार रक्तेपढीने आकारलेल्या अतिरिक्त शुल्काच्या पाचपट दंड वसूल करण्यात येणार आहे. त्यातून रुग्णांना त्याची रक्कम परत देऊन उर्वरित रक्कम परिषदेकडे जमा करण्यात येणार आहे. मात्र २०१४ ते २०१९ या कालावधीतील अतिरिक्त शुल्कावरील दंडातून कोणतीही रक्कम रुग्णाला परत देण्याची तरतूद नाही.

सर्वाधिक शुल्क जमा केलेल्या रक्तपेढ्या

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय – ३,०४,१८,९६५
हिंदुजा रुग्णालय – २,३२,४५,६४०
जसलोक रुग्णालय -२,२६,७५,८५०
लिलावती रुग्णालय – १,९९,९७,८८०
एशियन हार्ट – ९८,७८,५००
बॉम्बे रुग्णालय – ७५,११,३६०