scorecardresearch

Premium

फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई

पदपथांवर अन्नपदार्थ विकणाऱ्या स्टॉल्सविरुद्ध पालिकेने गुरुवारपासून धडक मोहीम हाती घेतली.

फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई

दिवसभरात १५० फेरीवाले हटविले; पालिकेची धडक मोहीम
पदपथांवर अन्नपदार्थ विकणाऱ्या स्टॉल्सविरुद्ध पालिकेने गुरुवारपासून धडक मोहीम हाती घेतली. वरळी, दादर आदी भागात दिवसभरात तब्बल १५० स्टॉल्सविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर पदपथांवरील अतिक्रमणेही या वेळी हटविण्यात आली. या कारवाईत मोठय़ा प्रमाणावर गॅस सिलिंडरही जप्त करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
पालिकेने गुरुवारी काकासाहेब गाडगीळ रोड, सेनापती बापट मार्ग, हाजी अली, शिवाजी पार्क, दादर (प.) रेल्वे स्थानक परिसर आदी ठिकाणी रस्त्यावर अन्नपदार्थ बनवून विकणाऱ्या फेरीवाले आणि स्टॉल्सविरुद्ध कारवाई केली. गुरुवारी सकाळी ७ वाजता सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. वडापाव, पाणीपुरी, चायनीज पदार्थाचे स्टॉल्स या कारवाईत तोडण्यात आले. पालिकेच्या जी-उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादर आणि जी-दक्षिण विभागाच्या साहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस संरक्षण न घेताच पालिकेने ही कारवाई केली. पालिकेच्या सुमारे ४० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

गॅस सिलिंडरबाबत चौकशीची मागणी
गुरुवारी कारवाई करण्यात आलेल्या स्टॉल्स आणि फेरीवाल्यांकडून पालिकेने मोठय़ा प्रमाणावर गॅस सिलिंडर आणि भांडी जप्त करण्यात आली, असे रमाकांत बिरादर यांनी सांगितले. अनधिकृत फेरीवाल्यांकडे मोठय़ा प्रमाणावर गॅस सिलिंडर सापडले असून त्यांना ते मिळाले कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.

World Cup 2023: In Hyderabad Pakistani cricketers ate biryani took selfies with fans watch the video
Pakistan Team: हैदराबादमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी मारला बिर्याणीवर ताव, चाहत्यांबरोबर घेतले सेल्फी, पाहा Video
hansie cronje & bob woolmer
World Cup Cricket: मॅच सुरू असताना कोच-कॅप्टन यांच्यात इअरपीसद्वारे गुजगोष्टी; सामनाधिकाऱ्यांची कारवाई
MCOCA against gang robbing passengers old Mumbai-Pune road
जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर प्रवाशांना लुबाडणाऱ्या टोळीविरुद्ध ‘मोक्का’
IND vs AUS: KL Rahul slams fitness questioners Said wicketkeeping is getting better in last few matches
KL Rahul: फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना राहुलभाईचं सडेतोड उत्तर; म्हणाला, “गेल्या काही सामन्यांत…”

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bmc action against illegal hawkers

First published on: 26-02-2016 at 03:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×