बंदुकीचा धाक दाखवून विजय मनुसखलाल सुरू (४०) या सराफाला एका दुकलीने मंगळवारी रात्री बोरीवली स्थानकालगत लुटले. मुंबई सेंट्रलहून आलेले सुरू हे मंडपेश्वर येथील आपल्या कारखान्याकडे निघाले होते. तेव्हा या दुकलीने मिरची पूड फेकत त्यांची बॅग पळविली. त्या बॅगेत केवळ दागिन्यांचे कॅटलॉग असल्याने सुरू यांची हानी टळली. बोरीवली पोलीस तपास करीत आहेत.