कांदिवली भागात शनिवारी संध्याकाळी एका गटारात सापडलेल्या दोन मृतदेहांची ओळख पटली आहे. ते मृतदेह कलाकार हेमा उपाध्याय आणि वकिल हरिश भंबानी यांचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. कांदिवली येथील ठाकूर इंटरनॅशनल स्कूलमागे पोइसर नाल्यात हे मृतदेह सापडले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी एका कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये हेमा उपाध्याय आणि हरिश भंबानी यांचे मृतदेह गटारात फेकलेले सापडले. या दोन्ही मृतदेहांवर कोणतीही जखम न सापडल्याने त्यांचा गळा आवळून हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी भागवती रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
हेमा आणि भंबानी हे दोघेही शुक्रवारी सायंकाळी ८.३० वाजल्यापासून बेपत्ता होते. हेमा यांच्या घरी काम करणा-या हेमंत मंडल याने त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. भामभानी यांच्या कुटुंबियांनेही ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 13th Dec 2015 रोजी प्रकाशित
अभिनेत्री हेमा उपाध्यायचा गटारात सापडला मृतदेह
कांदिवली भागात शनिवारी संध्याकाळी एका गटारात सापडलेल्या दोन मृतदेहांची ओळख पटली आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:
First published on: 13-12-2015 at 18:32 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bodies of artist hema upadhyay her lawyer found in mumbai drain