नेसले इंडिया कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. भारतात बंदी असलेल्या मॅगीच्या निर्यातीला मात्र मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. नेसले इंडियाने दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोट्यावधींच्या मालाच्या नुकसानाला सामोरे जावे लागणार असल्याने नेसले इंडियाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मॅगीला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याची बाजू नेसलेच्यावतीने यावेळी मांडण्यात आली आणि होणाऱया कोट्यावधींच्या नुकसानाची माहिती देण्यात आली. जर नेसले कंपनी मॅगी हे उत्पादन सुरक्षित असल्याचा दावा करत असेल तर मॅगीच्या निर्यातीला काहीच हरकत नसल्याचे स्पष्टीकरण अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) न्यायाधीश व्ही एम कानडे आणि बी पी कोलाबावाला यांच्या खंडपीठासमोर दिले. न्यायालयाने यावर नेसले कंपनीला दिलासा देत मॅगीच्या निर्यातीला परवानगी जाहीर केली.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jun 2015 रोजी प्रकाशित
भारतात बंदी असलेल्या मॅगीच्या निर्यातीला न्यायालयाची परवानगी
नेसले इंडिया कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. भारतात बंदी असलेल्या मॅगीच्या निर्यातीला मात्र मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे

First published on: 30-06-2015 at 03:57 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay hc allows nestle to export maggi to other countries