मुंबई : भर रस्त्यात पत्नीने मोठमोठय़ाने नपुंसक म्हणून हिणवल्याने लाज वाटणे स्वाभाविक आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने पत्नीचा खून करणाऱ्याची जन्मठेपेची शिक्षा कमी करून ती १२ वर्षे केली. अचानक प्रवृत्त केल्याने आरोपीकडून गुन्हा घडल्याचे न्यायालयाने त्याची शिक्षा कमी करताना नमूद केले. आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने पत्नीच्या खुनाप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने आरोपीने कोणत्या स्थितीत गुन्हा केला हे त्याची जन्मठेप रद्द करून त्याला १२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावताना प्रामुख्याने लक्षात घेतले. घटनेच्या दिवशी अचानक आरोपीला योगायोगाने पाहिल्यानंतर त्याच्या पत्नीने केवळ त्याची शर्टची कॉलर पकडून त्याला अडवलेच नाही, तर त्याला शिवीगाळ केली. तसेच भर रस्त्यात मोठमोठय़ाने त्याला नपुंसक म्हणून हिणवले याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2022 रोजी प्रकाशित
पत्नीच्या खूनप्रकरणी झालेली जन्मठेप रद्द
आरोपीला कनिष्ठ न्यायालयाने पत्नीच्या खुनाप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
Written by झियाउद्दीन सय्यद

First published on: 11-02-2022 at 00:43 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court canceled life sentence for wife s murder zws