मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्यासाठी अभिनेत्री केतकी चितळेने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. मात्र त्यावर सुनावणी हवी असल्यास तक्रारदारांना प्रतिवादी करावे आणि त्यांना नोटीस द्यावी, असे आदेश न्यायालयाने गुरुवारी केतकीला दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केतकीविरोधात एकूण २२ गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका गुन्ह्यात तिला जामीन मिळाला असून अन्य गुन्ह्यात अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. अटकेला आव्हान देण्यासह तिच्याविरोधातील गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी केतकीने याचिका केली आहे.

न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर केतकीची याचिका सुनावणीसाठी आली. त्या वेळी याचिकेवर सुनावणी हवी असल्यास तक्रारदारांना प्रतिवादी करण्याचे आणि त्यांना नोटीस देण्याचे आदेश न्यायालयाने केतकीला दिले. बदनामी करणे, धर्म आणि वंशाच्या आधारे विविध समाजांमध्ये शत्रुत्व वाढवणे या आरोपांतर्गत तिच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court order on marathi actress ketaki chitale petition zws
First published on: 29-07-2022 at 06:14 IST