ब्राह्मण समाजाने केंद्र सरकारच्या १०  टक्के सवर्ण आरक्षण कायद्याचा लाभ घ्यावा, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. “दलितांना आरक्षण मिळते मात्र आम्हाला आरक्षण मिळत नाही, अशी भावना ब्राह्मण, मराठा सवर्ण जातींमध्ये होती. त्या कारणानेही दलितांवर अत्याचार होत होते. त्यामुळे ब्राह्मण मराठा आणि सवर्णांमधील गरिबांना ज्याचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांच्या आता आहे, अशा लोकांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, अशी मागणी मी सर्वात आधी केली होती. सर्वच ब्राह्मण श्रीमंत नाहीत. ब्राह्मणांमध्ये गरिबांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी सर्व सवर्णांमधील गरिबांसाठी शिक्षण आणि नोकरी मध्ये १० टक्के सवर्णांना आरक्षण देणारा कायदा ३ वर्षांपूर्वी केला आहे. त्या कायद्याचा लाभ ब्राह्मण समाजातील गरिबांनी घ्यावा,” असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष ब्राह्मण समाजातील उमेदवारांना पाच जागांवर रिपाइंची उमेदवारी देणार असल्याची घोषणा यावेळी रामदास आठवले यांनी केली. “उत्तर प्रदेशातून ब्राम्हण आणि सर्व जातीचे लोक मुंबईत येऊन राहिले. मिळेल ते काम करून कष्ट करीत राहिले. त्यातील काही लोक व्यापारी बिल्डर उद्योजक आणि काही उच्च शिक्षित झाले. मात्र मध्यंतरी मुंबईत काही लोकांनी उत्तर प्रदेशातील लोकांना मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, अशी धमकी दिली. तेव्हा सर्वात आधी माझ्या रिपब्लिकन पक्षाने ‘ईट का जवाब पत्थरसे देंगे; असा प्रति ईशारा देऊन उत्तर प्रदेशातुन मुंबईत आलेल्या बांधवांना पाठिंबा दिला होता,” अशी आठवण रामदास आठवले यांनी सांगितली.  

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brahmin community should take advantage of the central government 10 per cent savarna reservation act says ramdas athawale hrc
First published on: 06-10-2021 at 16:10 IST