चुनाभट्टी येथील टाटानगर परीसरातील म्हाडाच्या जुन्या वसाहतीमधील इमारतीच्या पहिल्या मजल्याचे छत कोसळल्याने गजानन काळण (७५), सिद्धी काळण (३५), संतोष काळण (४५) व भूपेश काळण (११) हे चौघे जखमी झाले. यापैकी सिध्दी काळण हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोकमान्य टिळक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी दुपारी म्हाडा वसाहतीमधील ६ क्रमांकाच्या इमारतीमधील २०८ या खोलीचे छत कोसळल्याने ही घटना घडली. त्यानंतर तात्काळ जखमींना रूग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. चारजण किरकोळ जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या इमारती जुन्या झाल्यामुळे ही घटना घडल्याचे समजते.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2012 रोजी प्रकाशित
चुनाभट्टी येथे इमारतीचे छत कोसळल्याने चौघे जखमी
चुनाभट्टी येथील टाटानगर परीसरातील म्हाडाच्या जुन्या वसाहतीमधील इमारतीच्या पहिल्या मजल्याचे छत कोसळल्याने गजानन काळण (७५), सिद्धी काळण (३५), संतोष काळण (४५) व भूपेश काळण (११) हे चौघे जखमी झाले. यापैकी सिध्दी काळण हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोकमान्य टिळक रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
First published on: 16-12-2012 at 02:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Building slap fallen in chunabhatti four injured