लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामातील दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे संबंधित कंत्राटदारांनी ३१ मे पूर्वी पूर्ण करावीत. तसेच, येत्या ७ जून पूर्वी हे रस्ते पूर्णपणे वाहतूकयोग्य झाले पाहिजेत. अन्यथा त्यांच्याकडून ते काम काढून घ्यावे आणि अन्य दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करून कामे पूर्ण करावीत. तसेच, या कामांचा खर्च मूळ कंत्राटदाराकडून वसूल करावा. तसेच संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Leakage in the tunnels of the Sea Coast Project before the monsoon
पावसाळ्यापूर्वीच सागरी किनारा प्रकल्पातील बोगद्यांना गळती, मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी पाहणी
Rahulnagar drain at Chunabhatti is not even cleaned Fear of flooding
मुंबई : चुनाभट्टी येथील राहुल नगर नाल्याची आद्यपही सफाई नाही; पाणी तुंबण्याची भीती
Aarey to BKC Metro 3 will start soon MMRC trials to be completed within week
आरे ते बीकेसी मेट्रो ३ दृष्टीक्षेपात, आठवड्याभरात एमएमआरसीच्या चाचण्या होणार पूर्ण
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
17 years delay in filing appeal High Court fines petitioner Rs 50000
मुंबई : अपील दाखल करण्यासाठी १७ वर्षांचा विलंब, उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्तीला ५० हजारांचा दंड
fraud of 1.5 crore with director by lure of double profit
मुंबई : दुप्पट फायद्याच्या नावाखाली दिग्दर्शकाची दीड कोटींची फसवणूक
50-year-old women excelled in class 10 exams
मुंबई : पन्नाशी ओलांडलेल्या महिलांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश
Even if the monsoon comes list of dangerous buildings of MHADA is still waiting
मुंबई : पावसाळा तोंडावर आला तरी म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीची प्रतीक्षाच

मुंबई महानगरात ठिकठिकाणी रस्ते बांधणी व दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. बांगर यांनी ठिकठिकाणी रस्ते कामांची पाहणी केली. आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील रस्त्यांच्या कामांची नुकतीच पाहणी करून आढावा घेतला. रस्ते कामाशी संबंधित असलेल्या विविध विभागांनी आपापसात योग्य समन्वय ठेवून वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने कामे पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित करावे. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये, तसेच अपूर्ण कामांमुळे कोणतीही जीवितहानी होवू नये यासाठी सुरू असलेल्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे.

आणखी वाचा- आरे ते बीकेसी मेट्रो ३ दृष्टीक्षेपात, आठवड्याभरात एमएमआरसीच्या चाचण्या होणार पूर्ण

येत्या २८ मे रोजी रस्ते कामांचे मूल्यमापन करावे. ज्या रस्त्यांच्या कामांची प्रगती समाधानकारक आढळणार नाही त्याच्याशी संबंधित कंत्राटदारांना नोटीस जारी करावी. तसेच, ३१ मेपर्यंत रस्त्याची कामे पूर्ण न केल्यास आणि ७ जून पर्यंत रस्ते वाहतूक योग्य स्थितीत न आणल्यास त्यांच्याकडून ते कंत्राट काढून घ्यावे. त्यानंतर संबंधित कामासाठी अन्य कंत्राटदाराची नियुक्ती करून काम पूर्ण करून घ्यावे. या कामाचा संपूर्ण खर्च व दंड मूळ नियुक्त कंत्राटदाराकडून तात्काळ वसूल करावा, असे आदेश बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही कार्यपद्धती मुंबईत सुरू असलेल्या सर्व रस्ते कामांसाठी लागू असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पावसाळ्यात नागरिकांचा प्रवास सुकर व सुरक्षित व्हावा, यासाठी तात्काळ रस्ते खड्डेमुक्त करण्यात यावेत. रस्त्यांच्या कडेला असलेला राडारोडाही तात्काळ उचलून घ्यावा, अशाही सूचना बांगर यांनी यावेळी दिल्या. या पाहणी दौऱ्यात उप आयुक्त उल्हास महाले, सहायक आयुक्त संध्या नांदेडकर, प्रमुख अभियंता मनीष पटेल यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.