चंदीगड विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींचा आक्षेपार्ह व्हिडीओ लीक झाल्याने देशभरात पडसाद उमटले आहेत. हे प्रकरण ताजं असताना आता आयआयटी बॉम्बेमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील खाणावळीत काम करणाऱ्या एका कामगारानं विद्यार्थिनीचा बाथरूममध्ये छुप्या पद्धतीने व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रविवारी रात्री आयआयटी बॉम्बेच्या एका विद्यार्थिनीने पवई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. आयआयटी बॉम्बेमधील एका कॅन्टीन कर्मचाऱ्याने हॉस्टेल क्रमांक १० (एच१०) मधील बाथरूममध्ये तक्रारदार विद्यार्थिनीचा गुप्तपणे व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३५४ (क) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

हेही वाचा- “आरोपी मुलीने इतर मुलींचेही…” चंदीगड विद्यापीठातील विद्यार्थिनींचे व्हिडीओ लीक प्रकरणात वकिलाची कबुली

पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत म्हणाले, “कॅन्टीन कर्मचाऱ्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३५४ (क) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर रविवारी रात्री आरोपीला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आलं आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.”

हेही वाचा- विश्लेषण : आक्षेपार्ह व्हिडिओ लीक झाल्यास तुमचे कायदेशीर अधिकार काय आहेत?

‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, घटनेच्या दिवशी तक्रारदार तरुणी स्वच्छतागृहात गेली होती. यावेळी स्वच्छतागृहाच्या खिडकीतून कुणीतरी तिचं रेकॉर्डिंग करत असल्याचं तिला दिसलं. या प्रकारानंतर तिने आरडाओरडा केला. तसेच तातडीने वसतिगृह प्रशासनाकडे तक्रार केली. यानंतर आयआयटी बॉम्बेच्या वसतिगृह प्रशासनाने कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे फोन तपासले आहेत. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास केला जात आहे.