मुंबई : मुख्यमंत्री माझी ‘लाडकी बहीण’ या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेतील आयकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही. राज्य सरकारने आयकर विभागाकडे माहिती मागविली असली तरी अशी माहिती देण्याबबात आयकर विभागाने केंद्राच्या वित्त मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठविला असून, केंद्राच्या मान्यतेनंतरच ही माहिती मिळू शकेल.

आयकर भरणाऱ्या महिलांची माहिती मिळावी अशी विनंती राज्य सरकारच्या वतीने आयकर विभागाला सहा महिन्यांपूर्वी केली होती. पण अद्यापही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. गेले सहा महिने ही माहिती उपलब्ध न झाल्याने लाखो अपात्र लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत. सरकारी कर्मचारी असलेल्या अडीच हजारापेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी सरकारचे तीन कोटी ५८ लाख रुपये खिशात घातल्याचे आढळून आले आहे.

  • दोन कोटी ६३ लाख लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये घेतला. या अर्जांची नियमित पडताळणी सुरू आहे, असे सरकारच्या वतीने सांगितले जात आहे. मात्र ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे ही बाब सरकार सातत्याने नाकारत आहे.
  • सेवार्थ काम करणाऱ्या दोन लाख बहिणींच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर २२८९ लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असल्याचे जाहीर करण्यात आले, ही पडताळणी जानेवारी फेब्रुवारीमध्ये झालेली आहे.
  • लाडकी बहीण योजनेतील महितीसंदर्भात सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळली जाते. माहिती अधिकारातही ही माहिती दिली जात नाही.
  • अडीच हजार सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींनी एकूण १३ हजार ५०० रुपयांचा लाभ घेतल्याची जानेवारी फेब्रुवारीची माहिती मेअखेर उघड झाली.
  • चारचाकी वाहन वापरणाऱ्या लाडक्या बहिणींची केवळ पुण्यातील संख्या १० हजार ३५२ आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
  • राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेतील आठ लाख कुटुंबातील महिलांना आता या योजनेतील केवळ ५०० रुपये मिळणार आहे. या महिलांनी दुहेरी लाभ घेऊन सरकारची फसवणूक केली आहे.

आता ‘केवायसी’ तपासणी

हजारो महिला दरमहिन्याला वयाची ६५ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्याचवेळी २१ वर्षे वय पूर्ण करणाऱ्या तरुणींचे काय हा प्रश्न अनुत्तरित आहे. नवीन अर्ज घेतले जात नाहीत. २ कोटी ६३ लाख बहिणींमध्ये आता २ कोटी ५२ लाख बहिणींना लाभ दिला जात आहे. ही संख्या दरमहा कमी जास्त होत आहे. लग्न होऊन परराज्यात गेलेल्या महिलांचीही संख्या लक्षवेधी आहे. सरकारी कर्मचारी अथवा करदाता असलेल्या कुटुंबातील महिला अपात्र ठरणार आहेत. या योजनेतील दीड कोटी महिला ह्या पिवळ्या व केसरी शिधापत्रिकाधारक असल्याने त्यांची पडताळणी होणार नाही, असे महिला विकासमंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे.

आयकर विभागाकडून लाभार्थींची माहिती उपलब्ध झाल्यानंतर लाखो लाडक्या बहिणी नावडत्या होणार आहेत. आतापर्यंत नऊ लाख लाडक्या बहिणींची ओवाळणी बंद झाली आहे. या महिन्यात बँकांकडून लाभार्थींचे केवायसी तपासले जाणार आहेत. त्यातही काही बहिणी बाद होणार आहेत.

२२८९ सरकारी कर्मचारी

● सेवार्थ काम करणाऱ्या दोन लाख बहिणींच्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर २२८९ लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असल्याचे जाहीर करण्यात आले, ही पडताळणी जानेवारी फेब्रुवारीमध्ये झालेली आहे.

● लाडकी बहीण योजनेतील महितीसंदर्भात सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळली जाते. माहिती अधिकारातही ही माहिती दिली जात नाही.

● अडीच हजार सरकारी कर्मचारी असलेल्या लाडक्या बहिणींनी एकूण १३ हजार ५०० रुपयांचा लाभ घेतल्याची जानेवारी फेब्रुवारीची माहिती मेअखेर उघड झाली.

● चारचाकी वाहन वापरणाऱ्या लाडक्या बहिणींची केवळ पुण्यातील संख्या १० हजार ३५२ आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेतील आठ लाख कुटुंबातील महिलांना आता या योजनेतील केवळ ५०० रुपये मिळणार आहे. या महिलांनी दुहेरी लाभ घेऊन सरकारची फसवणूक केली आहे.