मध्य रेल्वे सज्ज; पहिल्या टप्प्यात १७० नाल्यांची सफाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य रेल्वेने पावसाळापूर्व कामांना सुरुवात केली आहे. पावसाळ्यातही लोकलचे वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी विविध कामांना गती दिली जात असून १० जूनपर्यंत ही कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात १७० छोटय़ा-मोठय़ा नाल्यांची सफाई करण्यात आल्याची माहिती दिली.

सध्या सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे मोठय़ा प्रमाणात परप्रांतीय कामगारांनी स्थलांतर के ले आहे. त्यामुळे १५ टक्के  मनुष्यबळातच पावसाळापूर्व कामे पूर्ण के ली जात असल्याची माहिती नुकतीच पश्चिम रेल्वेने दिली होती. मध्य रेल्वेलाही मनुष्यबळाची कमतरता भासत असली तरीही आहे त्या मनुष्यबळातही कामे उरकली जात आहेत. नालेसफाई, रुळांची उंची वाढवणे यासह अन्य कामे हाती घेतली आहेत.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १७० नाल्यांची सफाई के ली असून दादर, भायखळा, घाटकोपर, सायन, कु र्ला, कळवा, सॅन्डहर्स्ट रोड येथील भूमिगत नाले व गटारांचीही सफाई के ल्याचे सांगितले.

याशिवाय रेल्वे रुळांलगतच असलेल्या झाडांच्या फांद्यांचीही छाटणी के ली असून ८०० फांद्या छाटण्यात आल्या आहेत. महत्त्वाच्या असलेल्या कु र्ला, टिळक नगर येथील नाल्याची रुंदी वाढवण्याचेही काम हाती घेतले आहे.

पादचारी पूल आणि उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची थांबलेली कामे पाहता यातील काही महत्त्वाची कामेही हाती घेण्यात आली आहेत. कल्याण ते शहाड दरम्यान वालधुनी नदीवर असलेल्या पुलाचेही काम करताना याचे गर्डर बदलण्यात आले. जसईजवळील रेल्वेच्या उड्डाणपुलाचीही दुरुस्ती के ली. तर कोपर पुलाचेही काम हाती घेतल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway cleaning of 1 nallas in the first phase zws
First published on: 13-05-2020 at 02:27 IST