१३ नव्या सेवा, ५ सेवांचा विस्तार; वेळाही बदलणार
मध्य रेल्वेच्या मुख्य उपनगरीय मार्गावर १९ मार्चपासून १३ नव्या सेवा धावणार असून पाच सेवांचा विस्तार होणार आहे. या नव्या सेवांमुळे मध्य रेल्वेच्या दैनंदिन वेळापत्रकातही थोडाफार बदल होणार आहे. सध्या हार्बर, ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्ग यांवर मिळून मध्य रेल्वेवर १६४७ सेवा चालवल्या जातात. १९ मार्चपासून ही संख्या १६६० एवढी होणार आहे. विशेष म्हणजे सेवा विस्तार आणि नव्या सेवा यांमुळे सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी १४ जादा फेऱ्यांचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९ मार्चपासून सुरू होणाऱ्या नव्या गाडय़ा
अप गाडय़ा
’ बदलापूर-ठाणे लोकल बदलापूरहून सकाळी ७.५७ वाजता सुटून ठाण्याला ८.५० वाजता पोहोचेल
’ टिटवाळा-ठाणे लोकल टिटवाळ्याहून सकाळी ९.५४ वाजता सुटून ठाण्याला १०.४० वाजता पोहोचेल
’ कल्याण-कुर्ला लोकल कल्याणहून सकाळी १०.४१ वाजता सुटून कुल्र्याला ११.४० वाजता पोहोचेल
’ कल्याण-कुर्ला लोकल कल्याणहून दुपारी १.२० वाजता सुटून कुल्र्याला २.१८ वाजता पोहोचेल
’ कल्याण-ठाणे लोकल कल्याणहून संध्याकाळी ६.५८ वाजता सुटून ठाण्याला ७.२९ वाजता पोहोचेल
डाऊन गाडय़ा
’ टिटवाळा-आसनगाव लोकल टिटवाळ्याहून सकाळी ५.०५ वाजता सुटून आसनगावला ५.२६ वाजता पोहोचेल
’ ठाणे-टिटवाळा लोकल ठाण्याहून सकाळी ८.५९ वाजता सुटून टिटवाळ्याला ९.४६ वाजता पोहोचेल
’ ठाणे-कल्याण लोकल ठाण्याहून सकाळी १०.०६ वाजता सुटून कल्याणला १०.३८ वाजता पोहोचेल
’ कुर्ला-कल्याण लोकल कुल्र्याहून सकाळी १२.०२ वाजता सुटून कल्याणला १.०४ वाजता पोहोचेल
’ कुर्ला-कल्याण लोकल कुल्र्याहून सकाळी २.३२ वाजता सुटून कल्याणला ३.३१ वाजता पोहोचेल
’ विद्याविहार-कल्याण लोकल विद्याविहारहून ५.१५ वाजता सुटून कल्याणला ६.१४ वाजता पोहोचेल
’ विद्याविहार-कल्याण लोकल विद्याविहारहून ५.५९ वाजता सुटून कल्याणला ६.५४ वाजता पोहोचेल
’ ठाणे-बदलापूर लोकल ठाण्याहून ७.३३ वाजता सुटून बदलापूरला ८.२८ वाजता पोहोचेल
वेळापत्रकात खालीलप्रमाणे बदल
’ सकाळी ९.१९ वाजता सुटणारी ठाणे-सीएसटी जलद गाडी आता ९.०० वाजता सुटेल
’ सकाळी ८.५३ वाजता सुटणारी कल्याण-सीएसटी जलद गाडी आता ८.४७ वाजता सुटेल
’ संध्याकाळी ६.३३ वाजता सुटणारी सीएसटी-अंबरनाथ गाडी आता ६.२९ वाजता सुटेल
’ संध्याकाळी ६.२९ वाजता सुटणारी सीएसटी-कल्याण ही गाडी आता ६.३३ वाजता सुटेल
’ संध्याकाळी ६.४० वाजता सुटणारी सीएसटी-आसनगाव ही गाडी आता ६.३७ वाजता सुटेल
’ संध्याकाळी ६.४४ वाजता सुटणारी सीएसटी-बदलापूर ही गाडी आता ६.४७ वाजता सुटेल
’ संध्याकाळी ६.४७ वाजता सुटणारी सीएसटी-टिटवाळा ही गाडी आता ६.४४ वाजता सुटेल
’ संध्याकाळी ७.०३ वाजता सुटणारी दादर-कल्याण ही गाडी आता ७.०० वाजता सुटेल

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway schedule changes from 19 march
First published on: 17-03-2016 at 03:00 IST