मध्य रेल्वेच्या ‘डीसी-एसी’ विद्युतप्रवाह (डायरेक्ट करंट- अल्टरनेटिव्ह करंट) परिवर्तनासाठी आयोजित करण्यात आलेला विशेष मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. शुक्रवारी काही गाड्यांची सराव चाचणी होऊ न शकल्यामुळे आणि अन्य तांत्रिक बाबींची पुर्तता न होऊ शकल्यामुळे मध्य रेल्वेने हा मेगाब्लॉक पुढे ढकलला आहे. लवकरच रेल्वे प्रशासनातर्फे नव्याने मेगाब्लॉकची तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली.  तत्पूर्वी मध्य रेल्वेच्या नियोजित मेगाब्लॉकप्रमाणे शनिवारी मध्यरात्री १२ ते पहाटे किमान ६ वाजेपर्यंत एकही उपनगरीय लोकल धावणार नव्हती. या ब्लॉकमुळे शनिवारी ‘मरे’वरील शेवटची लोकल १२ वाजता सोडण्यात येणार होती. त्यामुळे रात्री शेवटची लोकल पकडणाऱ्या प्रवाशांना रात्री १२ पूर्वीच्या लोकल पकडण्याची कसरत करावी लागणार होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway special megablock in mumbai cancelled
First published on: 06-06-2015 at 05:59 IST