टिटवाळा – खडवलीदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवर कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे संध्याकाळी कामावरुन घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे.
टिटवाळा – खडवलीदरम्यान गुरुवारी संध्याकाळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. या बिघाडामुळे कल्याण – कसारा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे.