मुंबई : सीबीएसईचा मानसशास्त्र आणि एलएलबी पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटीची परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उडणारा गोंधळ लक्षात घेत एलएलबी पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात येणार आहे. सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.

हेही वाचा >>> मुंबईमधील काही भागातील हवाच ‘समाधानकारक’; घाटकोपरमधील हवा ‘वाईट’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या ४ एप्रिल रोजी असलेला सीबीएसईचा मानसशास्त्राचा पेपर आणि एलएलबी पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे सीईटी सेलचे संभाव्य वेळापत्रक असले तरी जाहीर केलेल्या तारखामुळे या परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी संभ्रमावस्थेत होते. त्याच दिवशी एलएलबी पाच वर्षे अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा होणार आहे. १ ते ४ एप्रिल दरम्यान बारावी सीबीएसई परीक्षामधील इतिहास, भाषा विषय आणि होम सायन्स आणि मानसशास्त्र या विषयांचे सलग चार दिवस पेपर असणार आहेत. यामुळे ४ एप्रिल रोजी मानसशास्त्र पेपर असल्याने त्यामुळे सीईटी सेलने १ ते ४ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत होती. याची दखल घेत सीईटी सेलने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.