महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध वसुलीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाने वसुलीचा आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. परमबीर सिंह आयोगासमोर उपस्थित राहत नाही त्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी लागत आहे. म्हणून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले जावे असे आयोगाचे वकील शिशिर हिरे म्हटले होते. यावर आयोगाने मंगळवारी ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मार्चमध्ये आयोगाची स्थापना केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात सिंह यांनी देशमुख यांच्यावर मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांना रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता.

आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना हे वॉरंट जारी करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. या अगोदर आयोगासमोर गैरहजर राहिल्याबद्दल आयोगाने परमबीर यांना तीनदा दंड ठोठावला आहे. तिसऱ्या अनुपस्थितीनंतर, परमबीर सिंग यांना २५,००० रुपये दंड करण्यात आला, जो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कोविड १९ च्या निधीमध्ये जमा करण्यास सांगितले गेले. आणि आता चौथ्यांदा अनुपस्थितीनंतर ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले.

याआधी परमबीर सिंह यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. आयोगाने आता परमबीर सिंहाच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या सुनावणीमध्ये आयोगासमोर हजर न राहिल्यास वॉरंट काढण्याचे आदेश देण्यात आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandiwal commission issues warrant former commissioner parambir singh abn
First published on: 07-09-2021 at 17:14 IST