पालिके च्या वांद्रे येथील विभाग कार्यालयाच्या उद्घाटनावरून भाजपचा टोला

मुंबई :पालिके च्या वांद्रे येथील एच-पश्चिम विभाग कार्यालयाचे गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र हे विभाग कार्यालय १ मे रोजीच नव्या जागेत स्थलांतरित झाले असून तीन महिने वापरात असलेल्या या वास्तूचे उद्घाटन करून सत्ताधारी पक्षाने मुख्यमंत्र्यांचीच फसगत के ली असल्याचा टोला भाजपचे स्थानिक आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी लगावला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच-पश्चिम’ विभाग कार्यालयाचे प्रशासकीय कार्यालय हे वांद्रे (पश्चिम) परिसरातील सेंट मार्टिन्स मार्गावर होते. हे कार्यालय आता खार (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळील दुसऱ्या हसनाबाद गल्लीमधील पालिकेच्या प्रशस्त जागेत उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीत स्थलांतरित झाले आहे. या इमारतीचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पालिका निवडणुका जवळ आल्यामुळे सध्या प्रत्येक लहान-मोठय़ा गोष्टीवरून शिवसेना व भाजपमध्ये वादाची ठिणगी पडत आहे. तर प्रत्येक नव्या विकासकामाचे श्रेय घेण्यावरूनही स्पर्धा सुरू आहे. गुरुवारी विभाग कार्यालयाच्या उद्घाटनावरूनही असाच वाद रंगला. हे कार्यालय आधीच स्थलांतरित झाले आहे, असा दावा आशीष शेलार यांनी के ला. त्याचबरोबर नवीन कार्यालयाच्या इमारतीसाठी आपण पाठपुरावा के ला होता, असाही दावा त्यांनी के ला आहे. एच-पश्चिम कार्यालयाची जुनी वास्तू अपुरी पडत असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालीन महापौर, पालिका आयुक्त, पालिका प्रशासनाकडे गेली सहा वर्षे सतत पाठपुरावा केला. या कामात स्थानिक नागरिक, स्थानिक संस्था यांनीही मोठा पाठपुरावा केला आहे. या कार्यालयाचा ठराव मांडून त्यासाठी निधी उपलब्धतेच्या बैठका, त्याची निविदा प्रक्रिया, प्रत्यक्ष काम व त्यामध्ये आलेल्या अडचणी याबाबत गेल्या सहा वर्षांत ८ वेळा बैठका घेतल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे. या कार्यालयाच्या निर्माणात शिवसेनेचा कुठलाच सहभाग नव्हता. मग श्रेय घेण्यासाठी अट्टहास कशाला असाही सवाल त्यांनी के ला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मे महिन्यात हे कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित झाले. तेव्हा पालिका प्रशासनाने त्याबाबत प्रसिद्धिपत्रकही काढले होते. नवीन इमारतीची जागा पूर्वीच्या कार्यालयापेक्षा सहापट मोठी आहे. नव्याने बांधण्यात आलेली इमारत सहा मजली आहे.  या प्रशस्त व भव्य इमारतीमध्ये अधिक क्षमतेचे वाहनतळ, अत्याधुनिक नागरी सुविधा केंद्र, अभ्यागत कक्ष, सभागृह, प्रेक्षागृह, उपाहारगृह, सुविधापूर्ण प्रसाधनगृहे इत्यादीचा समावेश आहे.