स्पर्धा परीक्षार्थी आणि जिज्ञासूंसाठी ज्ञानखजिना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : सनदी सेवेसह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वाटाडय़ा म्हणून ओळख बनलेला तसेच संशोधक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करणाऱ्यांसोबत वर्षभरात जगभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे कुतूहल असणाऱ्यांना उपयुक्त ‘लोकसत्ता वर्षवेध-२०१९’चा अंक वाचकांच्या भेटीला आला आहे. राज्यभरातील सर्वच वृत्तपत्र विक्रेत्यांकडे तो उपलब्ध झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी ‘लोकसत्ता वर्षवेध’चे प्रकाशन झाले.

अंकात सरकार आणि न्यायालयीन पातळीवर घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय आणि त्यांचे पडसाद यांवर यात सटीप माहिती देण्यात आली आहे. भारतीय क्रीडापटूंनी वर्षभरात जगभरात केलेली कामगिरी, लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेली राजकीय परिमाणे, मनोरंजन क्षेत्रात आलेली चरित्र सिनेमांची लाट याशिवाय साहित्य, पर्यावरण, समाजकारण आदी क्षेत्रांत घडलेल्या लक्षवेधी गोष्टींचा तपशील यात असणार आहे. दरवर्षीप्रमाणेही हा अंकही संग्रही ठेवावा, असा आहे.

अंकात काय?

वर्तमानाकडे उघडय़ा डोळ्यांनी पाहू इच्छिणाऱ्या सुजाण आणि सजग नागरिकांना गतवर्षांतील ठळक नोंदींचे भांडार ‘लोकसत्ता वर्षवेध’द्वारे उपलब्ध करून देण्यात येते. पहिल्या अंकापासून ‘वर्षवेध’कडे संदर्भमूल्य म्हणून पाहिले जात आहे. नेहमीप्रमाणेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पटलावर घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत त्यांचे व्यापक पातळीवर विश्लेषण या अंकामध्ये अनुभवायला मिळणार आहे.

प्रायोजक : तन्वी हर्बल्स प्रस्तुत, सहप्रायोजक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), ग्रॅव्हिटास फाऊंडेशन, सिडको, रुनवाल ग्रुप;

पॉवर्ड बाय : एमआयडीसी, व्ही.पी.बेडेकर अ‍ॅण्ड सन्स, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड., केसरी टूर्स, एम. के. घारे ज्वेलर्स, इन्फ्राटेक आणि लक्ष्य अ‍ॅकॅडमी. बँकिंग पार्टनर :  ठाणे जनता सहकारी बँक लिमिटेड.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister uddhav thackeray released loksatta varshvedh books zws
First published on: 31-01-2020 at 03:28 IST