विजेचा झटका लागल्याने एका ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री मानखुर्द येथे घडली. याबाबत मानखुर्द पोलीसांनी अपमृत्युची नोंद करून तपास सुरू केला आहे. सर्वेश गावकर (वय ११) असे या मृत मुलाचे नाव असून तो आई-वडीलांसह मानखुर्दच्या गणेश मंदिर परिसरात राहत होता. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास तो घराबाहेर असलेल्या लोखंडी जिन्यावर बसला होता.

हेही वाचा >>>“उद्धवजी, औरंगजेबाचं अपूर्ण स्वप्न तुम्ही …” भाजपा आमदार आशिष शेलार यांचं टीकास्र!

त्याचवेळी बाजूला असलेल्या विजेच्या बॉक्सला त्याचा स्पर्श झाल्याने, त्याला विजेचा धक्का लागला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ त्याच्या कुटुंबीयांनी गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मानखुर्द पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.