“जेव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेव्हा …” अभिनेत्री क्रांती रेडकरला पाठिंबा देत चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यावरील टीकेवरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडीवर हल्लाबोल केलाय.

एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांच्यावरील टीकेवरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडीवर हल्लाबोल केलाय. “आर्यन खानच्या पाठीशी बॉलिवूडसह सरकार उभं राहिलं, तर जीव धोक्यात घालणाऱ्या समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्यावर अभद्र भाषेत टीका सुरू आहे,” असा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय. तसेच मी महिला म्हणून अभिनेत्री क्रांती रेडकरसोबत आहे, असंही त्यांनी जाहीर केलं.

चित्रा वाघ म्हणाल्या, “काय जमाना आहे, आर्यन खानच्या पाठीशी बॅालिवूडसह सरकार उभं राहिलं, तर जीव धोक्यात घालणाऱ्या समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्यावर अभद्र भाषेत टीका सुरू आहे. जेव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं. क्रांती, महिला म्हणून मी तुझ्यासोबत आहे.”

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना काय इशारा दिला होता?

वर्षभरात समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकेल, असं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता फोन करत आहेत की यात माझा संबंध नाही. समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे मलिक म्हणाले. ते पिंपरी चिंचवड येथे बोलत होते.

“एनसीबी खोट्या केसेस दाखल करत आहे. हे सिद्ध केल्याशिवाय आम्ही थांबनार नाही. हे अधिकारी आणि भाजपाचे नेते लोकांवर दबाव निर्णान करुन या संस्थेच्या मार्फत हजारो कोटींचा वसुलीचा व्यवसाय महाराष्ट्रात करत आहेत. यांचा घोटाळा उघडीस आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही,” असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

हेही वाचा : “समीर वानखेडेंना त्रास देऊ नका”, राजस्थानमधून धमकीचा फोन आल्याचा नवाब मलिक यांचा दावा, तक्रार दाखल!

“मी वानखेडेंना आव्हान देतो वर्षभरात त्यांची नोकरी जाईल. तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकायला पुढं आले होते. आता देशातील जनता तुम्हाला तुरुंगात जातांना बघेल. तुम्ही कीती बोगस माणूस आहात याचे आमच्याकडे पुरावे आहेत. आगामी काळात ते पुरावे आम्ही बाहेर काढणार आहोत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावर वरुन दबाव होता, असे वानखेडे सांगतात. पण आता नवाब मलिक कुणाच्या बापाला घाबरत नाही”, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chitra wagh criticize mva government and support actress kranti redkar over sameer wankhede pbs

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या