एकमेकांवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करीत शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते बुधवारी रात्री परस्परांना भिडले. यावेळी झालेल्या दगडफेकीत एक पोलीस गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातील मानखुर्दमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि मनसेचे आदित्य शिरोडकर या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर पैसे वाटण्याच आरोप केला. राहुल शेवाळे यांची पत्नी कामिनी यांच्यावरही पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, त्या सध्या फरार असल्याचे समजते. पोलीस कर्मचाऱयावर हल्ला झाला, त्यावेळी कामिनी शेवाळे तिथे होत्या. त्यामुळे त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल माजवणे इत्यादी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे अधिकारी याप्रकरणी तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clashes in shivsena mns supporters
First published on: 24-04-2014 at 11:51 IST