गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत झाली. मात्र, निकालात भाजपाला दणदणीत विजय मिळताना दिसतोय. या पार्श्वभूमीवर आता गुजरातमधील निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला.यावर एकनाथ शिंदेंनी त्यांची भूमिका मांडली. ते गुरुवारी (८ डिसेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “आज आम्ही महाराष्ट्रात भरपूर काम करत आहोत. मुंबईचं सुशोभिकरण सुरू आहे. मुंबई स्वच्छ, सुंदर करून कायापालट झाला पाहिजे. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे.”

Raj Thackeray subhash dandekar camlin
Subhash Dandekar Death : जगभर डंका वाजवणाऱ्या मराठी उद्योजकाला राज ठाकरेंकडून श्रद्धांजली, Camlin च्या ‘उंटा’ची गोष्ट सांगत म्हणाले…
CM Eknath Shinde Answer To Uddhav Thackeray
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल, “पक्ष चोरला म्हणत लहान बाळासारखं किती दिवस…”
What Eknath Shinde Said?
“एकदा मार खाल्लाय,आता ताकही फुंकून…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सल्ला
Ashok Chavan
अशोक चव्हाण यांचं वक्तव्य, “गावागावांत मराठा-ओबीसी वाद सुरु झाला आहे, हे महाराष्ट्राच्या…”
Eknath Shinde
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या महिलांबरोबर तलाठ्यांकडून अरेरावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला इशारा; म्हणाले…
Raj Thackeray
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याची बातमी केव्हा मिळणार?” अमेरिकेत विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर; म्हणाले, “मॅटर्निटी होम…”
cm eknath shinde announcement
राज्य सरकारनं केली ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’ची घोषणा; कोणत्या धर्मीयांना मिळणार लाभ? एकनाथ शिंदे म्हणाले…
Eknath Shinde On Uddhav Thackeray
“लंडनमधील पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती चांगली”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

“…म्हणून आम्ही सरकार बदललं”

“मुंबईत देशातील-विदेशातील पर्यटक येतात. त्यांना ज्या सुविधा मिळायला हव्या होत्या त्या दुर्दैवाने आजपर्यंत मिळाल्या नाहीत. म्हणून आम्ही सरकार बदललं. हे सरकार सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारं सरकार आहे. मुंबईचाही कायापालट झाला पाहिजे. म्हणून आम्ही स्वच्छता आणि सुशोभिकरणाला प्राधान्य दिलं. लवकरच हे दृश्य स्वरुपात दिसेल आणि मुंबईकरांना लाभ होईल,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

“फडणवीस आणि त्यांची टीमही गुजरातमध्ये प्रचारासाठी गेले होते”

एकनाथ शिंदे म्हणाले, “मी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि गुजरातच्या नागरिकांचं अभिनंदन करतो. एक चांगला निकाल आला आहे. भाजपाला गुजरातमध्ये १५० पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीमही गुजरातमध्ये प्रचारासाठी गेले होते. त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करत आणि सर्वांना शुभेच्छा देतो.”

हेही वाचा : “हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता येईल आणि गुजरातमध्ये…”, संजय राऊत यांचं मोठं विधान

“मोदींची जादू देशात आणि विदेशात सगळीकडे आहे”

“मोदींची जादू देशात आणि विदेशात सगळीकडे आहे. आज आपल्याला जी-२० चं अध्यक्षपदही मिळालं आहे. हे आपल्या देशासाठी गौरवास्पद आहे. जी-२० चं नेतृत्व मोदींनी करणं हीदेखील देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातही मुंबईसह चार जिल्ह्यांमध्ये १४ बैठका आहेत. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचं ब्रँडिंग करण्याची संधी प्राप्त झाली आहे,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.