मुंबई : खेरवाडी पोलिसांनी वांद्रे येथून ३२ लाख रुपये किंमतीचे ८१ ग्रॅम कोकेन जप्त केले असून याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी एक आरोपी नायजेरियन आहे.

वांद्रे येथे एक जण अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खेरवाडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने वांद्रे परिसरातील एमआयजी क्लब मैदानाजवळील परिसरात सापळा रचून जुनैद खान (२६) या संशयित तरुणाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ३ ग्रॅम कोकेन सापडले. त्याची चौकशी केली असता त्याला नायजेरियन नागरिक ओलेनरोवाजू इमूओबू (४९) याने कोकेन पुरविल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वांद्रे येथील चिंबई कोळीवाडा येथे छापा टाकूर नायजेरियन नागरिक ओलेनरोवाजूला अटक केली. त्याच्याकडे ७९ ग्रॅम कोकेन सापडले.

दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी ८१ ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची किंमत ३२ लाख ४० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपींविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यातील विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपायुक्त (परिंडळ ८) मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविदास जांभळे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक वारे,सहाय्यक पोलीस निरीक्षक काते, भिसे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.