‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या विनोदी मालिकेतील ‘गुत्थी’ हे पात्र साकारणारा अभिनेता सुनील ग्रोव्हर एका नव्या वादात अडकला आहे. त्याच्या बीएमडब्ल्यू गाडीने मारुती अल्टोला दिलेल्या धडकेत तीन जण जखमी झाले. शीव-पनवेल महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.
पुण्याकडून वाशीकडे जात असलेल्या अल्टो गाडीला खारघर स्थानकानजीक ग्रोव्हर यांच्या गाडीने धडक दिली. या अपघातात अल्टोतील ऋषिराज लोखंडे (३५), श्रीरंग लोखंडे (५५) आणि बाळासाहेब पाटील (३६) हे तिघे जण जखमी झाले. त्यांच्यावर मेडिसिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाला त्यावेळी ग्रोव्हरचा चालक अनिल यादव (२९) हा गाडी चालवत होता. त्याला ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक एक तास खोळंबली होती.
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2014 रोजी प्रकाशित
अभिनेता सुनील ग्रोव्हरच्या बीएमडब्ल्यूने तिघांना उडवले
‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या विनोदी मालिकेतील ‘गुत्थी’ हे पात्र साकारणारा अभिनेता सुनील ग्रोव्हर एका नव्या वादात अडकला आहे.
First published on: 08-02-2014 at 03:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comedian sunil grover involved in a car accident