scorecardresearch

सामान्यांना लवकरच मंत्रालयात प्रवेश

राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आले असून गेल्याच आठवडय़ात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मंत्रालयत येऊन कामकाज सुरू केले.

मुंबई : करोना निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षांपासून जनताजनार्दनासाठी बंद असलेले मंत्रालयाचे प्रवेशव्दार लवकरच उघडले जाणार आहे. विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या सामान्यांना पूर्वीप्रमाणेच दुपारी दोन नंतर मंत्रालयात प्रवेश देण्याबावतचा प्रस्ताव गृहविभागाने मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. त्यांची मान्यता मिळताच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. करोनाची साथ ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने गुढीवाडव्यापासून सर्व निर्बंध काढले आहेत. मात्र  सामान्यांसाठी मंत्रालय प्रवेशाचे निर्बंध मात्र अजून कायम आहेत. करोना काळातही मंत्री, सचिवांच्या शिफारशीने येणाऱ्यांना तसेच उद्योगक- व्यावसायिक आणि तसेच मध्यस्थांना मंत्रालयाचे दरवाजे खुले असले तरी  अन्य लोकांना तसेच शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनाही मंत्रालयत प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागते. राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आले असून गेल्याच आठवडय़ात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मंत्रालयत येऊन कामकाज सुरू केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Common man soon get entry in mantralaya zws

ताज्या बातम्या