मुंबई : भारतातील प्रांतिक आणि सामाजिक वैविध्य आपल्या खाद्यासंस्कृतीतही पुरेपूर उतरले आहे. सण-समारंभ-उत्सवांमध्ये दिसणाऱ्या या खाद्यासंस्कृतीचे प्रतिबिंब आहे यंदाच्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या विशेषांकात उमटले आहे. या अंकाच्या प्रकाशननिमित्त आज, गुरूवार २१ मार्च रोजी मुंबईत खुल्या पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ६ वाजता ‘दादर माटुंगा कल्चरल सेंटर’ येथे होणाऱ्या या कार्यक्रमात सेलिब्रिटी शेफ निलेश लिमये, शेफ तुषार देशमुख आणि प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका मुग्धा गोडबोले परीक्षक असतील.

स्पर्धेसाठी तीन विषय देण्यात आले असून यातील कोणताही एक पदार्थ स्पर्धकांनी घरून करून आणायचा आहे, तसेच त्याची पाककृती मराठीत लिहून आणायची आहे. स्पर्धकांना जास्तीत जास्त दोन पदार्थ करून आणता येतील, मात्र स्पर्धेच्या निवड प्रक्रियेत एका स्पर्धकाचा केवळ एकच पदार्थ समाविष्ट केला जाईल, याची कृपया नोंद घ्यावी. यातील खरवस स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना जर खरवसासाठीचा चिक उपलब्ध झाला नाही, तर त्यांना ‘पितांबरी रुचियाना खरवस पावडर’ वापरण्याची मुभा आहे. स्पर्धेतील पाककृतींमध्ये नाविन्य असणे अपेक्षित आहे. स्पर्धेच्या विजेत्यांना पहिल्या तीन (पान ४ वर) (पान १ वरून) क्रमांकांची पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच इतरही काही निवडक पाककृतींना बक्षीसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणीच स्पर्धेच्या वेळेपूर्वी नोंदणी करता येईल.

हेही वाचा >>>राज्यात पाणीटंचाईचे संकट; निवडणुकीच्या हंगामात तीन हजार गावे टँकरग्रस्त, धरणांत ४१ टक्के साठा

या वर्षीच्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’मध्ये महाराष्ट्रापासून पश्चिम बंगालपर्यंत आणि केरळपासून जम्मू-काश्मीरपर्यंतच्या निवडक दहा राज्यांमध्ये सणसमारंभांना केल्या जाणाऱ्या खाद्यापदार्थांच्या पाककृती आहेत.

देशातील वैविध्यपूर्ण खाद्यासंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ विशेषांकाच्या प्रकाशनानिमित्त आज, गुरुवारी दादरमध्ये पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

पाककला स्पर्धेचे विषय

● सणासुदीला केला जाणारा कोणताही शाकाहारी गोड पदार्थ

● नवीन्यपूर्ण खरवस स्पर्धा

● सणासुदीला केला जाणारा कोणताही शाकाहारी तिखट पदार्थ

मुख्य प्रायोजक : ● पितांबरी रुचियाना द रिच टेस्ट !

सहप्रायोजक : ● सोसायटी चहा ● इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई ● सवाई मसाले

पॉवर्ड बाय : ● केसरी टूर्स ● आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट